मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रोहित पवारांच्या हस्ते remdesivir इंजेक्शनचे मोफत वाटप, सोलापूरच्या रुग्णांसाठी मदत

रोहित पवारांच्या हस्ते remdesivir इंजेक्शनचे मोफत वाटप, सोलापूरच्या रुग्णांसाठी मदत

रोहित पवार (Rohit pawar) यांच्या हस्ते पुणे, सोलापूर आणि अहमदनगरसाठी मोफत वाटप करण्यात आले आहे.

रोहित पवार (Rohit pawar) यांच्या हस्ते पुणे, सोलापूर आणि अहमदनगरसाठी मोफत वाटप करण्यात आले आहे.

रोहित पवार (Rohit pawar) यांच्या हस्ते पुणे, सोलापूर आणि अहमदनगरसाठी मोफत वाटप करण्यात आले आहे.

मुंबई, 11 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित (maharashtra corona cases) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर उपचारासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी (remdesivir injection) रुग्णांचे नातेवाईक पायपीट करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांच्या हस्ते पुणे, सोलापूर आणि अहमदनगरसाठी मोफत वाटप करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर ट्रस्टच्या (Nationalist Congress Welfare Trust) वतीने हे वाटप करण्यात आले आहे. आज रोहित पवार यांच्या हस्ते  सोलापूरसाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचे वाटप पदाधिकाऱ्यांमार्फत सरकारी यंत्रणेकडे सुपूर्द केले आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी ट्वीट करून दिली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहण्यास मिळत आहे. पुण्यासारख्या ठिकाणी कोरोना रूग्णांच्या नातेवाईंकाचा सरकारकडे आर्त टाहो करत आहे. तासंतास रांगेत उभे राहून सुद्धा रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नाही.

रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळबाजार करणाऱ्या कृत्रिम आणि टंचाई निर्माण करणाऱ्यावर सरकार कारवाई केली जात आहे. सामान्य जनतेला रेमडीसीवीर इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाहीये, अशा परिस्थितीत रोहित पवार यांनी रेमेडीसीवीर इंजेक्शनचे मोफत वाटप केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राहुल द्रविडच्या Viral Video मध्ये मुंबई-नागपूर पोलिसांची एन्ट्री, म्हणाले...

राष्ट्रवादीच्या वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने याआधीही लॉकडाऊनच्या काळात गरजू लोकांना मदत करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी सुद्धा रेमेडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना मोफत वाटप करण्यात आले आहे. रोहित पवार यांनी उचलेले पाऊल हे कौतुकास्पद जरी असले तरी यावरुन वाद पेटण्याची चिन्ह आहे.

First published:

Tags: Rohit pawar