गडचिरोलीत अवकाळी पावसाचे थैमान, वादळी वा-यामुळे पाच तालुके अंधारात

गडचिरोलीत अवकाळी पावसाचे थैमान, वादळी वा-यामुळे पाच तालुके अंधारात

दक्षिण गडचिरोली जिल्हयाच्या मुलचेरा अहेरी-सिरोंचा भामरागड तालुक्याला वादळी वा-याने झोडपलंय. यात मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालंय देशबंधुग्राम या गावात अनेक घरावरील पञे उडाली.

  • Share this:

गडचिरोली, १९ एप्रिल- जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून वादळी पावसाने दक्षिण भागातील परिसर झोडपून काढले. मूलचेरा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरं पडली आहेत. पाच तालुक्यांचा वीज पुरवठा बंद खंडीत झाला आहे. त्यामुळे या भागात नागरीकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

दक्षिण गडचिरोली जिल्हयाच्या मुलचेरा अहेरी-सिरोंचा भामरागड तालुक्याला वादळी वा-याने झोडपलंय. यात मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालंय देशबंधुग्राम या गावात अनेक घरावरील पञे उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान आष्टी ते आलापल्ली मुख्य महामार्गावर मोठे झाड कोसळल्याने पाच तालुक्यातील बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. वनविभाग आणि पोलिस प्रशासनातर्फे झाड बाजुला करुन रस्ता मोकळा केला. वादळी वाऱ्यामुळे जंगलातील अनेक झाडे विद्युत खांबावर कोसळल्याने अहेरी, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली या पाच तालुके अंधारात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 08:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading