गणेश गायकवाड, प्रतिनिधी, अंबरनाथ, 7मे: मुंबई पोलीस असल्याचं भासवत तोतया पोलिसाने एका तरुणीशी लग्न केलं. खोटी खाकी वर्दी दाखवत एका व्यक्तीनं 21 वर्षाच्या तरुणीचं आयुष्य उद्धवस्त केलं. लग्नानंतर महिन्याभरातचा आपला नवरा पोलीस नसल्याचा तरुणीला संशय आला. पोलीस आयुक्तालयातुन माहिती काढल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले.अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीच्या फिर्यादीवरून अंबरनाथ. पोलिसांनी सापळा रचून या तोतया पोलिसाला गजाआड केलं आहे.