मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फेसबुकवर जाहिरातबाजी करत ओढलं जाळ्यात, बीडमध्ये शेतकऱ्याला लाखोंना लुबाडलं

फेसबुकवर जाहिरातबाजी करत ओढलं जाळ्यात, बीडमध्ये शेतकऱ्याला लाखोंना लुबाडलं

Fraud in Beed: सोशल मीडियावर ट्रॅक्टर विक्रीची जाहिरातबाजी करून एका शेतकऱ्याला लाखो रुपयांना लुबडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  • Published by:  News18 Desk
बीड, 13 डिसेंबर: सोशल मीडियावर ट्रॅक्टर विक्रीची जाहिरातबाजी (advertisement on facebook) करून एका शेतकऱ्याला पावणे दोन लाखांना लुटल्याची (Fraud with farmer) घटना समोर आली आहे. आरोपींनी फेसबुकवर ट्रॅक्टर विक्री करायची असल्याचं सांगून गंडा घातला आहे. फिर्यादी शेतकऱ्याने सोशल मीडियावरील जाहिरातीला खरं समजून आरोपींच्या अकाउंटवर 1 लाख 81 हजार 400 रुपये पाठवले आहेत. आरोपींनी फिर्यादीकडून पैसे घेतले, पण ट्रॅक्टर दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने पिंपळनेर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. प्रशांत कायदे आणि धर्मेंद्र कुमार असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'महिंद्रा अर्जुन कंपनीचा एक ट्रॅक्टर विक्रीसाठी आहे', अशी जाहिरात केली होती. हेही वाचा-नागपुरात हायप्रोफाइल SEX रॅकेटचा पर्दाफाश; सलूनमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार आरोपींनी संबंधित जाहिरातीत संपर्कासाठी मोबाइल क्रमांक आणि पैसे कोणत्या बँक खात्यात पाठवायचे याबाबतचा तपशीलही देण्यात आला होता. यावर विश्वास ठेवून फिर्यादी अनंत गोरख मसवले यांनी आरोपींच्या बँक खात्यात फोन पे, गुगल पे आणि बँक खात्यातून एकूण 1 लाख 81 हजार 400 रुपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतरही आरोपींनी फिर्यादीला ट्रॅक्टर दिला नाही. हेही वाचा- Ahmednagar: सॅण्डलमध्ये मोबाइल लपवून पेपर केला व्हायरल; कॉपी बहाद्दराचा कांड पाहून पोलीसही हैराण आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शेतकरी अनंत मसवले यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मसवले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी 20 - 22 ऑक्टोबर दरम्यान फिर्यादीची फसवणूक केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अशाप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.
First published:

Tags: Beed, Crime news, Financial fraud

पुढील बातम्या