मी पळून गेलो नाही तर..., भक्ताच्या बायकोला घेऊन पळालेल्या महाराजाचा VIDEO आला समोर

मी पळून गेलो नाही तर..., भक्ताच्या बायकोला घेऊन पळालेल्या महाराजाचा VIDEO आला समोर

प्रवचनासाठी गेल्यानंतर चक्क भक्ताची बायकोच पळवून नेत्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

  • Share this:

भंडारा, 13 फेब्रुवारी : बाबा आणि महाराजांच्या भोंदूगिरीची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने समोर येत आहे. अशातच एका महाराजाने प्रवचनासाठी गेल्यानंतर चक्क भक्ताची बायकोच पळवून नेत्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता याच भोंदूबाबाने एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यावर केलेल्या आरोपांचा खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी भंडारा येथे दिनेशचंद्र मोहतुरे महाराज याला भागवतासाठी बोलावण्यात आलं होतं. या सप्ताहानंतर या महाराजांनी एका विवाहित महिलेल्या आपल्यासोबत पळवूनन घेऊन गेल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यातबरोबर या बाबांना चार पत्नी असल्याचेही समोर आले होते. मात्र आता या दिनेशचंद्र मोहतुरे महाराज यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.

वाचा-ठाण्यातही 500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ? उद्धव ठाकरे घेणार निर्णय

महाराजाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, मी पळून गेलो नव्हतो, असं महाराजांनी म्हटलं आहे. तसेच, “मी माझ्या घरी सुखरुप आहे. मी माझ्या गुरुसोबत आहे. तसेच, माझे मुलं व पत्नीसोबत मी घरीच आहे. कुठेही पळून गेलो नव्हतो. केवळ बदनामीसाठी या बातम्या पसरवण्यात आल्या”, असं मोहतुरे म्हणाले आहेत.

वाचा-मुंबई रंगणार 24 रंगात, दादरला भगवा तर माहिमला हिरवा रंग

वाचा-धक्कादायक! पेस्ट कंट्रोलनंतर केलं दुर्लक्ष, पुण्यातील दाम्पत्याचा मृत्यू

मोहतुरे यांनी त्यांच्या विरोधकांनी ही बातमी पसरवल्याचा आरोप केला आहे. मोहतुरे महाराज भागवत कथा सांगण्याचं काम करतात. सावनेर जवळच्या कुबाडा या गावचे ते राहणारे आहेत. वर्षभरापूर्वीही त्याने याच गावात भागवत सप्ताह केला होता. सात दिवस चालेल्या सप्ताहाची नुकतीच समाप्ती झाली. त्यानंतर तो गावातून गेला. गावकऱ्यांनी त्याला चांगलं मानधनही दिलं होतं. मात्र तो गेल्यानंतर एका घरातली तरुण विवाहिता बेपत्ता असल्याचं लक्षात आलं. दरम्यान अद्याप या महिलेबाबत माहिती मिळालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2020 09:10 AM IST

ताज्या बातम्या