मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पिशवीत आढळले पुरुष मृतदेहाचे तुकडे, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

पिशवीत आढळले पुरुष मृतदेहाचे तुकडे, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

  • Published by:  sachin Salve

नवी मुंबई, 12 सप्टेंबर : नवी मुंबईत ( navi mumbai) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एपीएमसी मार्केटच्या (apmc market navi mumbai) परिसरात एक प्लास्टिकची पिशवी आढळून आली आहे. या पिशवीमध्ये एका पुरुषाच्या मृतदेहाचे (dead body) तुकडे आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती. स्थानिकांनी या पिशवीकडे दुर्लक्ष केलं होतं. पण दुर्गंधी अधिक प्रमाणात पसरल्यामुळे याबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा या पिशवीमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळून आले होते. एका पुरुषाचे मृतदेहाचे हे तुकडे होते, असं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.

काँग्रेस आमदाराच्या सूनेचा पती आणि सासरच्या मंडळीवर 1 कोटी खंडणीचा आरोप

हा मृतदेह 30 ते 35 वयाच्या व्यक्तीचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृतदेह वाशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्यामुळे ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

२० रुपयांसाठी तरुणाची हत्या

दरम्यान, नाशिकमध्ये तरुणाची धारदार कटरने गळा चिरून हत्या (man cut neck with cutter) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. संबंधित तरुणावर हल्ला झाल्यानंतर संबंधित तरुण तब्बल आर्धा किलोमीटर जिवाच्या आकांतानं धावत होता. त्यामुळे रस्त्यावर अर्धा किलोमीटरपर्यंत रक्ताचे डाग पडले होते. पण शेवटी त्याचा मृत्यू झाला. या थरारक घटनेनं नाशिक (Nashik) शहर हादरून गेलं होतं. या घटनेचा तपास करत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित आरोपीनं अवघ्या 20 रुपयांसाठी ही हत्या केल्याचं उघड झालं आहे.

बाप्पाच्या दर्शनासाठी श्वेता तिवारीच्या घरी 'बिग बॉस' स्पर्धकांची हजेरी

पंडित उर्फ रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्या असं अटक केलेल्या 32 वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे. तर सुनिल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो एक मजूर असल्याचं पोलीस तापासात निष्पन्न झालं आहे. शुक्रवारी रात्री आरोपी पंडितनं रस्त्यावरून चालत जाणाऱ्या सुनिलला बीडी पिण्यासाठी 20 रुपये मागितले (Murder for just 20 Rs) होते. पण सुनिलनं पैसे देण्यास नकार दिला. यामुळे राग आल्यानं आरोपी पंडितनं सुनिल याच्या गळ्यावर धारदार कटरनं वार केला होता.  या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

First published:

Tags: नवी मुंबई