कोल्हा आणि कुत्र्यांची अशीही 'दुनियादारी', गावकरीही करतात लाड!

कोल्हा आणि कुत्र्यांची अशीही 'दुनियादारी', गावकरीही करतात लाड!

संपूर्ण दिवसभर हा कोल्हा माळीमळामध्ये असणाऱ्या कुत्र्यांबरोबर अक्षरशः धिंगाणा घालत असतो

  • Share this:

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

जुन्नर, 08 डिसेंबर : "ये दोस्ती हम नही छोडेंगे"... हे शोले सिनेमामधील गाणे आपण आत्तापर्यंत बर्‍याच वेळा पाहिले असेल ऐकले असेल किंवा गुणगुणले ही असेल..या गाण्यातील हे दोन मित्र पाहिल्यानंतर आपल्यालाही जर असा एखादा मित्र भेटला तर? अशी एक मैत्रीची जोडी एका उसाच्या मळ्यात पाहण्यास मिळत आहे आणि ही जोडी आणि एका कोल्ह्याची आणि कुत्र्याची

दोन भिन्न प्रकारचे प्राणी जर असे मित्र झाले तर आणि ते रोज रोज भेटत असतील तर  नक्कीच कुणालाही आवडेल. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकणे येथील माळी मळ्यामध्ये उसाच्या फडामध्ये राहणाऱ्या कोल्ह्याला मात्र येथील मानवी वस्तीमध्ये अनेक मित्र लाभले आहेत.

संपूर्ण दिवसभर हा कोल्हा माळीमळामध्ये असणाऱ्या कुत्र्यांबरोबर अक्षरशः धिंगाणा घालत असतो. येथील लहान मुले आबालवृद्ध या कोल्हाला चपाती, भाकरी, दूध खाऊ घालतात आणि हा कोल्हाही त्यांच्या हातची भाकरी एखाद्या कुत्र्याप्रमाणे खातोय.

दिवसभर या कोल्ह्याचे वास्तव्य माळी मळ्यातच असते. कोणाच्या ओट्यावर, कोणाच्या अंगनात कोणाच्या शेतामध्ये तर कुणाच्या बांधावर हा कोल्हा दिवसभर तुम्हाला गोंधळ घालताना दिसेल.

रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना या कोल्हा बरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. खऱ्या अर्थाने आज वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढत चालला असताना माळी मळ्यातील हा माणसाळलेला कोल्हा पाहिल्यावर तुझ्या 'उसाला लागलं कोल्हा' असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर नक्कीच येणार नाही.

 

Published by: sachin Salve
First published: December 9, 2019, 1:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading