नागपूर, 23 मे: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी महाराष्ट्रातल्या कोरोना व्हायरसबाबत (corona virus in Maharashtra) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्यात कोरोना व्हायरसची चौथी लाट येणार का, या प्रश्नावर राजेश टोपेंनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले राज्याचे आरोग्यमंत्री
राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाही, असं स्पष्ट राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत नाही. लसीकरण चांगलं झालं आहे. ॲक्टिव्ह रुग्ण 1950 आहेत. सध्या हा फार मोठा विषय नसल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत.\
औरंगाबाद हादरलं..! पती-पत्नीची हत्या; कुजलेल्या अवस्थेत आढळले घरात मृतदेह
कोरोनाचा आजचा आकडा 254 नवीन रुग्ण आहेत. रिकव्हरी 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात कोविडची चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही, असंही आरोग्यमंत्री म्हणाले आहेत.
गर्दी करताहेत, राजकीय मेळावे करतात तरीही कोरोना रुग्ण अपेक्षित वाढत नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. चौथ्या लाटेची सुतराम शक्यता वाटत नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. बूस्टर डोसबाबत केंद्राच्या सुचना आहे त्यानुसार बूस्टर डोस देतोय. ॲटीबॉडीजची टेस्ट करुन लोक बूस्टर बाबत निर्णय घेत आहेत, असंही ते म्हणालेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus, Maharashtra News, Rajesh tope