खेळता खेळता चिमुरडी पडली शौचालयाच्या टाकीत, आईचा आक्रोश पाहून अनेकांचे अश्रू अनावर

खेळता खेळता चिमुरडी पडली शौचालयाच्या टाकीत, आईचा आक्रोश पाहून अनेकांचे अश्रू अनावर

खेळता खेळता अफिफा शौचालयाच्या टाकीजवळ गेली आणि तिचा तोल जाऊन ती टाकीत पडली.

  • Share this:

ठाणे, 18 नोव्हेंबर: महानगर पालिकेच्या सार्वजनिक शौचाल्याच्या टाकीत पडून एका 4 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. मिरा भाईंदर येथे ही दुर्दैवी घटना घडली असून या प्रकरणी ठेकेदार आणि महानगर पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत चिमुरडीच्या आई-वडिलांनी केली आहे.

अफिफा मुस्तफा अली अन्सारी असं मृत चिमुरडीचं नाव आहे. ऐन दिवाळी सणात ही घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा...आरोग्य कर्मचाऱ्यांनी 45 सेमी बर्फातून रस्ता काढत वाचवले कोरोना रुग्णांचे प्राण

मिळालेली माहिती अशी की, मिरा भाईंदरमधील काशीमिरा उड्डाणपुलाच्या खाली सध्या महापालिकेचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. त्याच ठिकाणी असलेल्या एका शौचालयाच्या टाकीचे झाकण कामादरम्यान उघडे ठेवण्यात आलं होतं. या 4 वर्षीय चिमुरडी अफिफा खेळत होती. खेळता खेळता अफिफा शौचालयाच्या टाकीजवळ गेली आणि तिचा तोल जाऊन ती टाकीत पडली. या दुर्घटनेत अफिफाचा मृत्यू झाला आहे. काशीमिरा पोलीस मुलीचा शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफिफा अन्सारी यांचे मूळ कुटुंब हे मुंबईतील मालाड या परिसरात वास्तव्यास आहे. ती दिवाळीच्या निमित्ताने तिच्या आई-वडिलांसोबत मिरा-भाईंदर या ठिकाणी एका नातेवाईकांकडे आली आहे. यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी जबाबदार असणाऱ्या ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

टिश्यू पेपरमुळे गमावला जीव...

दुसरीकडे, मुंबईतील मुलुंड भागात एक खळबळजनक घटना घडली. एका टिश्यू पेपरवरून एका ग्राहकाची हत्या करण्यात आली. एक टिश्यू पेपरवरून वाद झाला आणि ग्राहकाला मारहाण करण्यात आली. मुलुंडमध्ये असलेल्या एका ढाब्यावर नवनाथ जेवायला आले होते. दरम्यान जेवताना त्यांनी अस्वच्छ टिश्यू पेपरबद्दल तक्रार केली. यातून वेटर आणि नवनाथ यांच्यात बाचाबाची झाली. त्यांनी नवनाथला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात नवनाथ यांना जीव गमवावा लागला.

मुलुंड येथील नवघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ आपल्या मित्रासोबत ढाब्यावर जेवायला गेला होता. टिश्यू पेपरबाबत तक्रार केल्यानंतर वेटरनं नवनाथच्या डोक्यात टाईल्स फेकून मारली. यात नवनाथ जागीच कोसळला.

त्याच्या मित्रानं त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र मेंदूला दुखापत झाल्यामुळे नवनाथचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस सध्या तिन्ही आरोपींची कसुन चौकशी करत आहे. वेटरसह मारहाणीत अजून किती लोकं सामिल होते, याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा.....तर रस्त्यावर उतरेन, एकनाथ खडसेंच्या सूनबाईंचा थेट ऊर्जामंत्र्यांना इशारा

दरम्यान, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. रामलाल गुप्ता, दिलीप भारती आणि फिरोज मोहम्मद खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. नवनाथ यांनी अस्वच्छ टिश्यू पेपरवरून तक्रार केली. रागातून वेटरनं जेवण्यासाठी आलेल्या नवनाथला मारहाण करण्यास सुरुवात केली. नवनाथच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर हत्येच्या गुन्ह्याखाली तिघांना अटक करण्यात आली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 18, 2020, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading