Home /News /maharashtra /

हरियाणात अटक केलेल्या 4 दहशतवादी महाराष्ट्रात मुक्कामी, कसे पोहोचले नांदेडमध्ये?

हरियाणात अटक केलेल्या 4 दहशतवादी महाराष्ट्रात मुक्कामी, कसे पोहोचले नांदेडमध्ये?

चार दिवसांपूर्वी हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) करनाल (Haryana's Karnal district)जिल्ह्यातून पोलिसांनी 4 दहशतवाद्यांना (terrorists) अटक केली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

    नांदेड, 10 मे: चार दिवसांपूर्वी हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) करनाल (Haryana's Karnal district)जिल्ह्यातून पोलिसांनी 4 दहशतवाद्यांना (terrorists) अटक केली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. हे चौघे फिरोजपूरहून महाराष्ट्रातील नांदेडला स्फोटकं घेऊन जात असल्याची माहिती चौकशीदरम्यान समोर आली होती. आता याबाबतीत आणखी नवी माहिती समोर आली आहे. करनाल येथे पोलिसांनी शस्त्रसाठ्यासह अटक केलेले चार दहशतवादी नांदेडमध्ये तब्बल चार दिवस मुक्कामी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान हे चौघे जण नांदेडमध्ये वास्तवास होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर हे दहशतवादी बिदर मार्गे गोव्याला गेले. नांदेड मध्ये असताना ते कुणाकुणाला भेटले याची माहिती गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. World Smallest Car : जगातली सगळ्यात छोटी कार, एक लिटर पेट्रोलमध्ये चालते इतके किलोमीटर  दरम्यान, याच दहशतवाद्यांनी नांदेडमध्ये आरडीएक्स पाठवले अशी चर्चा आहे. मात्र या चर्चेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाकारलं आहे. त्यांनी नांदेडमध्ये कुठलीही कारवाई केली किंवा शस्त्र ठेवल्याची माहिती अजून मिळाली नाही. त्यातच नांदेड पोलीसांची एक टीम सध्या करनाल येथे आहे. स्फोटकांसह चार दहशतवाद्यांना अटक या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. दहशतवादी कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळ्या आणि गनपावडर घेऊन जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली गनपावडर आरडीएक्स (RDX) असू शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवाद्यांचा अनेक ठिकाणी मोठ्या घटना घडवून आणण्याचा प्लान होता. मिळालेल्या माहितीनुसार, 4 दहशतवाद्यांकडून गनपावडर, गोळ्या, शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. गुरुवारी पहाटे 4 वाजता बसताडा टोल प्लाझा येथून सर्वांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण इनोव्हा गाडीतून जात होते. मधुबन पोलीस स्टेशनचे बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी आहे. प्राथमिक तपासात हे सर्वजण पंजाबहून दिल्लीला जात असल्याचे निष्पन्न झाले असून आयबीच्या अहवालावरून नाकाबंदी करून त्यांना अटक करण्यात आली आहे. संशयित दहशतवाद्यांचं महाराष्ट्र कनेक्शन करनाचे एसपी गंगाराम पुनिया यांनी सांगितलं की, चार तरुणांना अटक करण्यात आली असून हे चौघेही पंजाबचे रहिवासी आहेत. हा दारूगोळा ड्रोनद्वारे फिरोजपूरला पाठवण्यात आला असून आरोपींमध्ये गुरप्रीत, परमिंदर, अमनदीप आणि भूपेंद्र यांचा समावेश आहे. हे चौघे फिरोजपूरहून महाराष्ट्रातील नांदेडला स्फोटकं घेऊन जात असल्याची माहिती आतापर्यंत मिळाली आहे. या चौघांचेही बब्बर खालसाशी संबंध आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे वय सुमारे 20 ते 25 वर्षे आहे. हे चारही दहशतवादी पंजाबचे रहिवासी एसपी गंगाराम पुनिया यांनी सांगितलं की, दहशतवादी हरविंदर सिंग रिंडानं दहशतवाद्यांना आदेश दिले होते. पाकिस्तानातून दहशतवाद्यांना लोकेशन पाठवण्यात आलं होतं. या चार दहशतवाद्यांना तेलंगणाला IED पाठवायचं होतं. यापूर्वी दोन ठिकाणी IED चा पुरवठा करण्यात आला आहे. मधुबन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ACP इंद्री करणार आहेत. पोलिसांनी दहशतवाद्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, 31 जिवंत काडतुसे, 3 लोखंडी कंटेनर आणि 1 लाख 30 हजार रुपये जप्त केले आहेत. तीन दहशतवादी फिरोजपूरचे रहिवासी आहेत. त्याचवेळी एक दहशतवादी लुधियानाचा रहिवासी आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Nanded

    पुढील बातम्या