अकोल्यात वारकऱ्यांच्या रिक्षाला ट्रकची धडक, 4 ठार

अकोल्यात वारकऱ्यांच्या रिक्षाला ट्रकची धडक, 4 ठार

वाशिम जिल्ह्यातून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली.

  • Share this:

05 फेब्रुवारी : अकोल्यातल्या श्री क्षेत्र शेगाव इथं गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झालाय.या अपघातात चार भाविक ठार, तर आणखी चार गंभीर जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

वाशिम जिल्ह्यातून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक सांयकाळी ४.१५ वाजता घडलेल्या या अपघातात चार भाविक ठार, तर आणखी चार गंभीर जखमी झाले.

संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा कापसे या गावातील काही भाविक शेगाव येथे जाण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी निघाले. वारीसोबत एक मालवाहू वाहनही होते. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी ही पायदळ वारी अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यावरून जात असताना मागून आलेल्या आर. जे. १३ जी. सी. ०७८२ क्रमांकाच्या ट्रकने पायदळ दिंडीसोबत असलेल्या एम. एच. ३७ बी. ३६८ क्रमांकाच्या तीन चाकी वाहनास धडक दिली. यावेळी या वाहनात ९ वारकरी बसलेले होते.

धडक दिल्यामुळे भाविकांचे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले; परंतु, वाहनातील भाविक रस्त्यावरच पडले. मागून आलेला ट्रक या भाविकांच्या अंगावर उलटला. ट्रकमधील सरकीच्या पोत्यांखाली दबल्याने चार भाविक जागीच ठार झाले, तर दोन भाविकांनी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मृतकांमध्ये काशीनाथ चंद्रभान कापसे, रमेश धनाजी कापसे, लिला कापसे, काकडे ( सर्व रा. उमरा-कापसे ) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये सरजूबाई कापसे, लोडबाई बळीराम कापसे यांचा समावेश आहे. जखमींना अकोला येथे हलविण्यात आले आहे. बाळापूर महामार्ग वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस घटनास्थळी पोहचली.

First Published: Feb 5, 2018 11:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading