Home /News /maharashtra /

हाहाकार! नाल्याच्या पुरात बैलगाडी गेली वाहून, नातू आणि आजोबासह चौघांचा मृत्यू

हाहाकार! नाल्याच्या पुरात बैलगाडी गेली वाहून, नातू आणि आजोबासह चौघांचा मृत्यू

नाल्याला अचानक पूर आल्याने बैलगाडी वाहून गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे.

    नरेंद्र मते (प्रतिनिधी), वर्धा, 4 जुलै: नाल्याला अचानक पूर आल्याने बैलगाडी वाहून गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांसह 12 वर्षाच्या एका मुलाचा समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी शेताचे कामे आटोपून कामावरून परत घरी जात असताना ही घटना घडली. काही पुरुष मजूर आणि महिला बैलबंडीच्या सहाय्याने रस्ता पार करत होते. अचानक बैलगाडी नाल्याच्या पुलावर फसल्याने दोन महिला पाण्याच्या प्रवाहात वाहू गेल्या. रात्री उशिरा दोघींचे मृतदेह आढळले. सोनेगाव स्टेशन येथील चंद्रकला लोटे आणि तळेगाव टालाटूले येथील बेबी भोयर अशी मृत महिलांची नाव आहेत. हेही वाचा.. लॉकडाऊन आणखी किती दिवस? देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे सरकारला सवाल दुसऱ्या एका घटनेत 12 वर्षाच्या नातवासह आजोबाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. सोनेगाव येसंबा येथून येणाऱ्या नाल्यात गोजी येथे 12 वर्षीय मुलाचा आणि त्याचा आजोबाचा मृतदेह आढळला आहे. धोत्रा येथून सावली सासताबाद येथे जात असताना येरणगाव गोजी नाल्यात प्रवाह जास्त आल्याने आजोबा आणि नातू बैलगाडीसह वाहून गेले. नातू आणि आजोबा बैलगाडी देण्यासाठी जात असताना ही घटना घडली. बळीराजावर दुहेरी संकट... दुसरीकडे, विदर्भातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. वर्ध्यात बोगस बियाण्याचा प्रकार समोर आला आहे. शेकडो शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले. पेरणीही आटोपली पण पेरुन 10 दिवस झाले, तरी अद्याप पेरलं ते उगवलंच नाही. पाऊस आला, जमिनीतील ओल पाहूनच पेरणी केली. पण 10 दिवस लोटूनही अंकुर निघाले नसल्याने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. सर्व शेतकरी संकटात सापडले आहेत. समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव हे संपूर्ण शेतकऱ्याचं गाव आहे. काही शेतकऱ्यांनी गावातील कृषी सेवा केंद्रातून बियाण्याची खरेदी केली, तर काहींनी वर्धा शहरातील दुकानातून खरेदी केली. घरात असणारा कापूस विकला गेला नाही आणि यावर्षी मजूरही सापडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीवर भर दिला. हेही वाचा.. मुंबईत पावसानं पुन्हा धरला जोर, नौदल आणि NDRFला सतर्क राहण्याच्या सूचना एक-दोन नव्हे तर तब्बल शेकडो शेतकऱ्यांनी शेतात जे पेरलं ते उगवलंच नाही. एकाच शेतकऱ्याकडे 7 एकरच्यावर शेती आहे. 50 हजाराच्या घरात पेरणीवर खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे.
    First published:

    Tags: Flood, Vidarbha, Wardha

    पुढील बातम्या