मिठामुळे गुन्हा उघड! प्रेयसीच्या मदतीनं पत्नीची हत्या करून पुरलं प्रेयसीच्याच घरात

मिठामुळे गुन्हा उघड! प्रेयसीच्या मदतीनं पत्नीची हत्या करून पुरलं प्रेयसीच्याच घरात

बहुचर्चित प्रवलिका सोनी खून प्रकरणात चार आरोपींना जन्मठेप तर उर्वरित चार आरोपींना 5 वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा खून करुन प्रेयसीच्याच घरात पुरल्याची ही घटना ऑगस्ट 2017 मध्ये सोलापुरातील विडी घरकुल येथे घडली होती.

  • Share this:

सागर सुरवसे (प्रतिनिधी)

सोलापूर, 15 मे- बहुचर्चित प्रवलिका सोनी खून प्रकरणात चार आरोपींना जन्मठेप तर उर्वरित चार आरोपींना 5 वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा खून करुन प्रेयसीच्याच घरात पुरल्याची ही घटना ऑगस्ट 2017 मध्ये सोलापुरातील विडी घरकुल येथे घडली होती. आरोपी पती नरहरी श्रीमल आणि त्याची प्रेयसी विनोदा संदुपटला या दोघांनी प्रवलिका सोनी हिचा घरातच गळा दाबून खून केला होता.

काय आहे हे प्रकरण...?

बायकोवर प्रेम उरले नाही म्हणून प्रेयसीच्या दारात पुरल्याचा प्रकार सोलापुरात घडला आहे. एका प्रेमवीर पतीने आपल्या विवाहापश्चात एका अविवाहीत महिलेशी अनैतिक संबंध ठेवले होते. त्यामुळे पत्नीचा अडसर सुरु झाला. त्यामुळे आपल्या प्रेयसीच्या साहाय्याने त्याने पत्नीचा काटा काढला.

युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असते असं आपण नेहमीच ऐकतो. मात्र मुळातच अनैतिक असलेल्या प्रेमामध्ये पोलिसांनी मात्र त्याच्या प्रियकर आणि प्रेयसीला माफ केले नाही. कारण त्याने एका निरपराध महिलेचा खून केला आणि आपल्या प्रेयसीच्या घरातच तिचा मृतदेह पुरुन टाकला. मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला तो त्याच्या चुकीमुळेच.

मागील दोन वर्षांपासून नरहरी श्रीमल आणि विनोदा संदुपटला त्यांचे प्रेम जुळले होते. मात्र, त्यात अडसर ठरत होती ती त्याची धर्मपत्नी प्रवलिका. त्यामुळेच वारंवार प्रेमाच्या आड येणाऱ्या पत्नीचा तिचा पती नरहरीनेच खून केला. आपली प्रेयसी विनोदा संदुपटला हिच्या मदतीने हा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे पती नरहरी श्रीमल आणि त्याची प्रेमिका विनोदा संदुपटला या दोघांनी प्रवलिकाला प्रेयसीची मैत्रिणी अंबाबाई कणकी हिच्या घरात बोलावून तिचा गळा दाबून खून केला. ही बाब कोणाला कळू नये म्हणून तिचा मृतदेह विनोदाच्या घरातच पुरून टाकला. हा प्रकार इथेच थांबत नाही तर आरोपी पती नरहरीने आपल्या सासरी जाऊन आपली बायको बेपत्ता असल्याचे सांगितले.

मिसिंगची तक्रार एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दाखलही केली. मात्र, प्रकार इथे थांबला नाही. यादरम्यानच ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार पोलिसमित्र या उपक्रमातील एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरुन सहाय्यक पोलिस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे यांनी संबंधित घटनेचा तपास सुरु केला. त्यावरून प्रवलिका श्रीमल हिचा मृतदेह नरहरीची प्रेयसी विनोदाच्या घराच्या कंपाउंडमध्ये पुरुन ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोपी पती नरहरी श्रीमल याला वळसंग पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांच्यासोबत सहआरोपी असलेली प्रेयसी विनेदा संदुपटला, तिची मैत्रीण अंबाबाई कणकी यांनाही वळसंग पोलिसांनी अटक केली.

असा आहे घटनाक्रम..

शनिवार 12 ऑगस्ट 2017 रोजी रात्री 12 च्या सुमारास प्रवलिका श्रीमल हिला तिचा पती नरहरी आणि प्रेयसी विनोदा यांनी अंबाबाई कणकी हिच्या सुंचू विडी घरकूल येथील 256 क्रमांकाच्या घरी नेले. यावेळी तिला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्याचा संशय आहे. तिथे मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पती नरहरीने प्रवलिकाचा गळा दाबला आणि उर्वरीत तिघांनी त्याला मदत केली. त्यानंतर प्रवलिकाचा मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये घातला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृतदेह नरहरीची प्रेयसी विनोदाच्या घरी नेण्यात आला. तिथे दोन कामगारांच्या मदतीने खड्डा खोदून घेण्यात आला.

त्याचवेळी त्यांनी एका दुकानदाराकडून दोन पोती खडेमीठ खरेदी केले. लोकांनी याबाबत हटकल्यानंतर घरी कार्यक्रम असल्याचे कारण सांगितले. नेमकी इथेचमाशी शिंकली. यामुळे लोकांना संशय बळावला. त्यातूनच या चर्चेने संपूर्ण विडी घरकुल परिसरात चर्चा झाली. मात्र, मीठ नक्की कशासाठी मागवले हे अनेकांना कळले नाही. यावरुनच पोलिस मित्राच्या मनात पाल चुकचुकली आणि ही बाब पोलिसांच्या लक्षात आणून दिली आणि त्यानुसार तपास सुरू झाला. पुढे तपास उघड झाला.

अंधश्रद्धा आणि आघोरी बळीचा प्रकार?

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नरहरीची प्रेयसी विनोदा संदुपटला ही विधवा आहे. तिच्या अंगात येत होते. ती परिसरातील लोकांचे भूत बाधा, करनी, जारन-मारम काढण्याचे काम करत होती. त्याशिवाय तिची मैत्रीण अंबाबाई कणकी ही देखील करनी करण्याचे काम करीत होती. तिच्याच घरात प्रवलिकाचा बळी देण्यात आला. नरहरी हा देखील त्यांच्या जाळ्यात आला होता. तो रात्री अपरात्री उठून विनोदाकडे जात असे. प्रवलिकाला वारंवार झोपेच्या गोळ्या देत असल्याची माहिती कुटुंबातील व्यक्तीनी दिली. शिवाय ज्या रात्री कणकी हिच्या घरी हा खून झाला तिच्या घरात प्रवलिकाला कुंकू लावण्यात आले होते. तिला समोर बसवून कोणतीतरी पूजा करण्यात येत होते. त्यादरम्यान प्रवलिका ही ओरडत होती. मात्र काही काळाने तिचा आवाज बंद झाला. त्यानंतर रविवारी दुपारी अंबाबाई कणकी हिने आपले पूर्ण घर धुवून घेतले. ही सर्व पार्श्वभूमी पाहता यामध्ये अघोरी विद्येतून प्रवलिकाचा खून झाला, असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुटुंबाची वाताहत..

नरहरी आणि प्रवलिका यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. आई गेली आणि बापही जेलमध्ये गेला त्यामुळे या लहानग्यांची मात्र वाताहत झाली आहे. बापाच्या अनैतिक प्रेमाची नशा आणि अंधश्रद्धेच्या झिंगमुळे त्यांची तीन चिमुरडे रस्त्यावर आली आहेत.

VIDEO : पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरदिवसा कोयते घेऊन गँगचा धुडगूस

First published: May 15, 2019, 6:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading