कोरोनाच्या भीतीने पुण्याहून गावी जाणाऱ्या कुटुंबावर काळाची घाला, आईसह 2 मुली जागेवरच ठार

कोरोनाच्या भीतीने पुण्याहून गावी जाणाऱ्या कुटुंबावर काळाची घाला, आईसह 2 मुली जागेवरच ठार

लोहारा तालुक्यातील खेड पाटीजवळ कंटेनर व कारचा शुक्रवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला.

  • Share this:

उस्मानाबाद,20 मार्च: लोहारा तालुक्यातील खेड पाटीजवळ कंटेनर व कारचा शुक्रवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात चालकासह एक महिला आणि तिच्या दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना सोलापूर येथे तर तिघांना उस्मानाबादला येथे उपचारासाठी हालवण्यात आलं आहे.

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे हे कुटुंब आपल्या गावी माकणीला येत असताना गाव अवघे तीन किलोमीटर अंतरावरच असतानाच काळाने घाला घातला. या घटनेमुळे गावातील नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा...8 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह सापडला, 12 मार्चपासून होती बेपत्ता, भयानक सत्य समोर

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील माकणी येथील नारायण साठे व सतिश पवार हे कामानिमित्त पुण्यातच वास्तव्यास होते. कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. पुणे शहरात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत आहे. विषाणूबाधीत रूग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

नारायण साठे आपल्या कुटूंबासह व सतिश पवार यांचे कुटुंब. एकाच कारने पुण्याहून शुक्रवारी गावी माकणीकडे जात असताना खेड पाटीजवळ माकणीहून येणाऱ्या कंटेनरची (एम.एच.13 आर 1257) व कारची (एम.एच. 12 पीएच 6326) जोरदार धडक बसली. यात चालक नेताजी मनोहर मोरे यांच्यासह मनिषा नारायण साठे, वैष्णवी नारायण साठे, वैभवी नारायण साठे हे चार जण जागेवरच ठार झाले. तर नारायण हरीदास साठे व त्यांचा मुलगा हरीश नारायण साठे हे गंभीर जखमी झाले आहेत. यांना पुढील उपचारासाठी सोलापुरला हालवण्यात आलं आहे. तर शितल सतिश पवार, संस्कृती सतिश पवार, वेदांत सतिश पवार हे ही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबादला हालवण्यात आलं आहे. या अपघातात मायलेकरांसह चौघांचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असून माकणी गावांर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा... येणारा काळ कठीण, गर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल- अजित पवार

First Published: Mar 20, 2020 07:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading