मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काळजाचं पाणी करणारी घटना, डोळ्यासमोर अख्खं कुटुंब उद्धवस्त झाल्याचं पाहून आईने धक्कानेच सोडला जीव

काळजाचं पाणी करणारी घटना, डोळ्यासमोर अख्खं कुटुंब उद्धवस्त झाल्याचं पाहून आईने धक्कानेच सोडला जीव

Jalgaon Coronavirus : चौघांचा मृत्यू झाल्याने परदेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Jalgaon Coronavirus : चौघांचा मृत्यू झाल्याने परदेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Jalgaon Coronavirus : चौघांचा मृत्यू झाल्याने परदेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जळगाव, 26 मार्च : राज्यभरात कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. जळगाव जिल्हाही (Jalgaon District) याला अपवाद नाही. जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढत असताना रावेर तालुक्यातील सावदा येथे गेल्या चार दिवसात परदेशी कुटुंबातील तिघांचा कोरोनाने तर एकाचा धक्क्याने मृत्यू झाला आहे.

मागील महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या वाढीसोबत कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. यामध्ये अनेक कुटुंबातील कर्ताधर्ता माणूस गेल्याने पूर्ण कुटुंबच उद्धवस्त होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. रावेर तालुक्यातही अशीच एक घटना समोर आली आहे.

हेही वाचा - Corona Breaking: '...तर 2 एप्रिलपासून पुण्यात लॉकडाऊन',अजित पवारांचे स्पष्ट संकेत

रावेर तालुक्यातील सावदा येथील शिवाजी चौक परिसरात राहणाऱ्या पत्रकार कैलास परदेशी यांच्या कुटुंबात गेल्या आठवडाभरात तिघांचा कोरोनाने तर वृद्ध मातेचा या तिघांच्या मृत्यूनंतर धक्क्याने मृत्यू झाला. चौघांचा मृत्यू झाल्याने परदेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दुर्दैवी घटनेत पत्रकार कैलास परदेशी, त्यांचे बंधू किशोर परदेशी, वहिनी संगिता परदेशी या तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर वृद्ध आई कुवरबाई परदेशी यांचा धक्क्याने मृत्यू झाला आहे. एकाच आठवड्यात चौघांचा मृत्यू झाल्याने मोठा मानसिक धक्का या परिवाराला बसला.

या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून सर्वजणच हळहळ व्यक्त करत आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Jalgaon