सख्या भावांचा 8 दिवसांनी होता लग्नसोहळा, मात्र आई-वडिलांसह कुटुंबावर काळाने घातला घाला

सख्या भावांचा 8 दिवसांनी होता लग्नसोहळा, मात्र आई-वडिलांसह कुटुंबावर काळाने घातला घाला

खामगाव येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.

  • Share this:

बुलडाणा, 30 मे : घरातील लग्नकार्य आठ दिवसांवर आलं असताना संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे. खामगाव येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खामगाव शहरातील बर्डे प्लॉट येथील सजनपुरी भागातील जाकिर भूरू पटेल (22), भुरू घासी पटेल (52), जावेद भूरू पटेल (25) आणि साजेदा बी भूरू पटेल (50) हे घरात असताना विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. यातील जावेद याचे 7 जून तर जाकिर याचे 8 जून रोजी लग्न होते.

पटेल कुटुंबातील एका मुलाची सासरवाडी वाशिम तर दुसऱ्याची सासरवाडी खामगांवमधील असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील व शिवाजी नगरचे ठाणेदार सुनील हुड घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र या घटनेतील चौघांचा मृत्यू की आत्महत्या हे अद्यापही अस्पष्ट आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 30, 2020, 9:58 PM IST
Tags: Buldana

ताज्या बातम्या