कोल्ड स्टोरेजमध्ये 3 दिवसांपासून भडकलीय आग, 4 जवान जखमी

कोल्ड स्टोरेजमध्ये 3 दिवसांपासून भडकलीय आग, 4 जवान जखमी

कोल्ड स्टोरेजच्या स्लॅबला लाकडाचे आवरण असून, ते जळून खाली कोसळले. जळीत लाकडी स्लॅब जवानांच्या अंगावर पडल्याने ते जखमी झालेत. जखमींना गांधीबाग येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, सोमवारला दुपारी पहिल्या कोल्ड स्टोरेजला आग लागली. ती अद्यापही सुरूच आहे तर, मंगळवारी दुपारी परत याच शेजारी असलेल्या चार माळयांच्या स्टोरेजलाही आग लागली.

  • Share this:

नागपूर, 17 एप्रिल- भंडारा महामार्गावरील कापसी मोहगाव इथे सोमवारी दुपारी मसाल्याच्या कोल्ड स्टोरेजला लागलेली आग धुमसत आहे. धुमसत्या आगीमुळे वातावरणात धुराचे लोट उठले आहेत. शेजारी असलेला कोल्ड स्टोरेजही आगीच्या भक्षस्थानी आला आहे. आग विझवण्यात वस्त असलेले अग्निशमन दलाचे 4 जवान जखमी झाले आहेत. मिरचीने भरलेल्या चार माळयाचे कोल्ड स्टोरेजची आग किमान महिनाभर राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कापसी मोहगाव येथे सुरुची मसालेच्या कोल्ड स्टोरेजला सोमवारी (15 एप्रिल) दुपारी लागलेली आग तिस-या दिवशीही धुमसतेय. आग विझवताना अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. डी.बी.​बिनीकर, आर. डी. पवार, योगेश खोडके आणि रोशन कावळे अशी जखमींची नावे आहेत.

कोल्ड स्टोरेजच्या स्लॅबला लाकडाचे आवरण असून, ते जळून खाली कोसळले. जळीत लाकडी स्लॅब जवानांच्या अंगावर पडल्याने ते जखमी झालेत. जखमींना गांधीबाग येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, सोमवारला दुपारी पहिल्या कोल्ड स्टोरेजला आग लागली. ती अद्यापही सुरूच आहे तर, मंगळवारी दुपारी परत याच शेजारी असलेल्या चार माळयांच्या स्टोरेजलाही आग लागली.

आग किमान महिनाभर राहील- अंदाज

नागपूरच्या भंडारा महामार्गावरील कापसी मोहगाव येथे सोमवारी दुपारी सुरुची मसालेच्या कोल्ड स्टोरेजला लागलेली आग अद्यापही सुरूच असून, शेजारी असलेल्या दुसरा कोल्ड स्टोरेजलाही आज आग लागली. आग विझविण्यात व्यस्त असलेल्या चार जवानांच्या अंगावर येथील लाकडी स्लॅब व जळालेला भाग पडल्याने ते जखमी झालेत. मिरची भरलेल्या सहा माळयाचे कोल्ड स्टोरेजची आग किमान महिनाभर राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे स्टोरेज जमीनदोस्त होण्याचीच प्रतीक्षा करण्यात येतेय.

तर, शेजारच्या कोल्ड स्टोरेजमधील मसाल्याचे पदार्थही आगीत भस्मसात झाले आहे. अग्निशमन विभागाचे जवान दिवसरात्र आग विझविण्यात व्यस्त आहेत.

- सुनील डोकरे, फायर आफिसर, नागपूर अग्निशमन विभाग

मिरची भरलेल्या कोल्ड स्टोरेजला ही आग लागली आहे. ही आग किमान महिनाभर राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या कोल्ड स्टोरेजला लागलेल्या आगीतीलही ही मोठी आग आहे. घटनास्थळावरून पुढील पंधरा दिवस बंब हलणार नाही, अशी स्थिती आहे. संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून, परिसरात बाहेरच्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.दुसरीकडे, शेजारच्या कोल्ड स्टोरेजमधील मसाल्याचे पदार्थही आगीत भस्मसात झाले आहेत. यात हळद, मीरे व इतर सामग्रीचा समावेश आहे. अग्निशमन विभागाचे जवान आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

कापसी खुर्द येथील सुरूचीचे हे स्टोरेज महामार्गाला लागून आहे. 1.4 एकर परिसरात हे विस्तारले असून, पहिल्या पाच माळयाच्या स्टोरेजमध्ये हजारो मिरची पोते भरून आहे. पाचव्या, चौथ्या व तिसऱ्या माळयांपर्यंत ही आग पसरली आहे. तर, दुसरे स्टोरेज चार माळयांचे आहे. येथे सर्वच माळयांवर आग पसरली आहे. जैन व कटारिया यांच्या मालकीचे हे स्टोरेज आहे.

VIDEO: नागपुरात मसाल्याच्या कोल्ड स्टोरेजला लागलेली आग अद्यापही धुमसती

First published: April 17, 2019, 4:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading