मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गिरीश महाजन यांच्या 'होमटाऊन'मध्ये एका आठवड्यात 4 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

गिरीश महाजन यांच्या 'होमटाऊन'मध्ये एका आठवड्यात 4 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एकाच आठवड्यात चार शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एकाच आठवड्यात चार शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एकाच आठवड्यात चार शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

जामनेर,13 मार्च:जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एकाच आठवड्यात चार शेतकऱ्यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीचा कर्जमाफी योजनेबाबत शेतकरी समाधानी नसल्याचे जामनेर तालुक्यात बोललं जातं आहे. विशेषता जामनेर तालुका हा भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. एका आठवड्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोविंदसिंग मोतीरामसिंग राजपूत (रा.बेटावद) या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन, विलास श्रीरंग पाटील (रा.ओझर) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. जगदीश रतन सिंग राजपूत (रा. मोहाडी) आणि गोपीचंद पुंडलिक जाधव (रा. मांडवे) अशी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. याबाबत जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा..आमच्याकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, अजित पवारांचा खोचक टोला

दरम्यान, सत्तेवर आलेलं प्रत्येक सरकार शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू म्हणत असते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्जमाफीची घोषणा केली होती. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारनेही कर्जमाफीची घोषणा केली. एवढंच नाही तर लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. पण कर्जमाफीच्या यादीत नाव आल्याचा अनेक शेतकऱ्यांचा आनंद औटघटकेचा ठरतो आहे. त्यात गेल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यात गारपीट झाली. अवकाळी पावसाने राज्याच्या मोठ्या भागात रब्बी पिके उध्वस्त झाली आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानाचे पंचनामे झालीत. पण मदत केव्हा मिळणार? गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाची मदत अजून मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा..कोरोनाचा जगभर धुमाकूळ, नगर जिल्ह्याला 600 कोटींचा फटका

First published:
top videos

    Tags: Farmer