BREAKING:मुंबईत कोरोनाने शनिवारी घेतला चौघांचा बळी, मृतांचा आकडा 22 वर

BREAKING:मुंबईत कोरोनाने शनिवारी घेतला चौघांचा बळी, मृतांचा आकडा 22 वर

मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 330 झाली आहे. मुंबईत शनिवारी 52 नवे रुग्ण आढळले आहेत तर कोरोना विषाणूने चार जणांचा बळी घेता आहे.

  • Share this:

मुंबई, 4 एप्रिल: मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 330 झाली आहे. मुंबईत शनिवारी 52 नवे रुग्ण आढळले आहेत तर कोरोना विषाणूने चार जणांचा बळी घेता आहे. त्यामुळे एकट्या मुंबईत मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. दुसरीकडे, मुंबईत शनिवारी 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईतील एकूण 34 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा.. कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेची डिलीव्हरी, बाळाच्या प्रकृतीबाबत डॉक्टर म्हणाले...

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या वर

राज्यात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहे. त्यातही सर्वात जास्त धोका मुंबईला निर्माण झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 537 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. असं असतानाही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीमध्ये आतापर्यंत तीन कोरोना पॉझिटिव्ह केसेस सापडल्या आहेत. त्यापैकी पहिल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याचं थेट कनेक्शन दिल्लीत निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमासोबत असल्याचं समोर येत आहे.

हेही वाचा..माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासह कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करा

निजामुद्दीन मरकजमध्ये उपस्थित असलेल्यांपैकी 10 लोकांपैकी 6 जण मुंबईतील धारावी परिसरात राहात होते. त्यापैकी चार लोक सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये वेगवेगळ्या भागांत 4 जण राहात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यापैकी 2 लोकांचा पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू आहे. अद्यापही हे दोन जण सापडू शकले नाहीत. त्यामुळे मुंबईचा धोका वाढला आहे. धारावीमध्ये 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा व्यक्ती तबलिगी जमातच्या लोकांना भेटला होता. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तबलिगी जमातचे 4 जण केरळमध्ये गेल्याची माहिती सूत्रांनी माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2020 07:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading