ट्रान्सफार्मरवर धडकली भरधाव इंडिका कार, भीषण अपघातात चार जण ठार

ट्रान्सफार्मरवर धडकली भरधाव इंडिका कार, भीषण अपघातात चार जण ठार

कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील इंडिका कार ट्रान्सफार्मर धडकून झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले.

  • Share this:

बीड, 18 मार्च:कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील इंडिका कार ट्रान्सफार्मर धडकून झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. गेवराई तालुक्यातील तांदळा गावाजवळ मध्यरात्री ही घटना घडली. या अपघातात आणखी एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आंबेजोगाई वरून नगरकडे जाणाऱ्या इंडिका कारच्या चालकाचा ताबा सुटून इंडिका कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरवर धडकल्याने ट्रान्सफार्मर गाडीवर पडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी होते यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात एवढा भयानक इंडिका कारची ट्रान्सफार्मरला धडक बसताच मोठा आवाज झाला. त्या आवाजाने तांदळा परिसरातील लोक झोपेतून जागे झाले.

सविस्तर वृत्त लवकरच...

First published: March 18, 2020, 11:33 AM IST

ताज्या बातम्या