धुळ्यात 3 वाहनांचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

धुळ्यात 3 वाहनांचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे शहराजवळील लळींग घाटात झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. अन्य सहा जण जखमी झाले आहेत.

  • Share this:

दीपक बोरसे, (प्रतिनिधी)

धुळे, 12 जून- मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे शहराजवळील लळींग घाटात झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. अन्य सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना धुळ्यातल्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबई येथून धुळ्याकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या गोदावरी दुध संघाच्या वाहनावर जाऊन आदळला, त्यानंतर ॲपे रिक्षालाही या ट्रकने धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत जाऊन पडला. या भीषण अपघातात सुरत येथील दोन आणि मालेगाव येथील एक व्यक्तीसह एक अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकची धडक इतकी भीषण होती की गोदावरी दूध संघाच्या आयशर गाडीची एक बाजू पूर्णपणे कापली गेली आहे.

आलिया जाकीर अली (वय-7), नौशाद बी अहमद अली (वय- 40), अहमद अली साहाब अली (वय-45) अशी चार पैकी तिघांची नावे असून अद्याप एकाची ओळख पटलेली नाही. हे कुटुंब अमळनेरहून गोदावरी दूध संघाच्या गाडीतून मालेगाव येथे कार्यक्रमाला जात होते.

नाशिकहून चारधामला निघालेल्या यात्रा कंपनीच्या बसला भीषण अपघात

नाशिकहून चारधामला निघालेल्या यात्रा कंपनीच्या बसला मध्यप्रदेशात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण ठार तर 7 गंभीर जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यात मंगळवारी (11 जून) रात्री साडे नऊच्या सुमारास विदिशा-सागर महामार्गावर हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

मिळालेली माहिती अशी की, सर्वज्ञ यात्रा कंपनीची ही बस आहे. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बस उज्जैनहून चित्रकूटला निघाली होती. बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रत्येकी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.

CycloneVayu: चक्रीवादळाची गुजरातकडे वेगानं कूच, पोरबंदरहून थेट ग्राऊंड रिपोर्ट

First published: June 12, 2019, 3:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading