औरंगाबादेत भीषण आग.. चार झोपड्या खाक, अनेक जनावरं होरपळून दगावली

औरंगाबादेत भीषण आग.. चार झोपड्या खाक, अनेक जनावरं होरपळून दगावली

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गराडा येथे अचानक लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या. धक्कादायक म्हणजे या आगीत चार मुकी जनावरं होरपळून दगावली आहेत.

  • Share this:

सिध्दार्थ गोदाम (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 12 मे- जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गराडा येथे अचानक लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या. धक्कादायक म्हणजे या आगीत चार मुकी जनावरं होरपळून दगावली आहेत. तसेच गृहपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास गराडा येथे ही घटना घडली.

या आगीत भरत रायसिंग राठोड, सरिचंद हिरा राठोड, ब्रह्मदेव नामदेव राठोड, आनंदा गलचंद राठोड यांची घरे जळून खाक झाली आहेत. घराला लागलेल्‍या भीषण आगीत चार जणावरांचा होरपळून मृत्‍यू झाला आहे. या आगीत घरातील संसार साहित्य, शेती अवजारेही जळून खाक झाली आहेत.

या घटनेची माहिती मिळताच तलाठी विकास वाघ यांनी प्रथम नगरपरिषद व बारामती अॅग्रोचे अग्निशामक दलाची गाडी बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेचा पंचनामा करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. यातील ब्रह्मदेव नामदेव राठोड यांच्या घरी 19 मे रोजी लग्न होते. या आगीत लग्नसाठी खरेदी केलेले सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्‍याची माहिती मिळाली असून आगीचे कारण अस्पष्ट आहे.

VIDEO: रामदास आठवलेंचा मोदींना चिमटा, म्हणाले पुन्हा संधी दिली तर...!

First published: May 12, 2019, 6:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading