किशोर गोमाशे, (प्रतिनिधी)
वाशिम, 13- रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोयाळी भिसडे येथे विवाहितेचा जळीत मृतदेह आढळला आहे. दिपाली काळे अशी मृत महिलेची ओळख पटली आहे. सासरच्या लोकांनी दिपालीची हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा माहेरच्या नातेवाईकांनी घेतला आहे. दिपालीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
6 महिन्यांपूर्वी झाला होता विवाह...
हिंगोली जिल्ह्यातील शेगाव खोडके येथील दिपालीचा विवाह कोयाळी येथील शाम काळे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यांत दिपालीची सासरी छळ केला जात होता. माहेरावरून 7 लाख रुपये आणण्यासाठी मानसिक त्रास देत तिचा खून केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. जोपर्यंत दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात लज्जास्पद घटना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन नराधमाने बलात्कार केला आहे.
नागपुरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 376 कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडीच्या घटनेनंतर अवघ्या तीन दिवसांत अल्पवयीन मुलीवर बलात्काराची ही दुसरी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागपूरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदी ऐरणीवर आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काय म्हणाले आदित्य ठाकरे? पाहा UNCUT पत्रकार परिषद