इम्तियाज अली, प्रतिनिधी
मुक्ताईनगर, 27 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी (ncp) पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (rohini khadse) खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी खडसे या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव इथं विवाहाच्या निमित्ताने हळदीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. हळदीचा कार्यक्रम आटोपून त्या घरी परत येत होत्या. रोहिणी खडसे या आपल्या फॉर्च्युनर गाडीने येत असताना अचानक काही इसमांनी हल्ला केला. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या दगडफेकीनंतर एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर खडसे समर्थकांची घराजवळ गर्दी जमली असून वातावरण तापले आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला pic.twitter.com/3z8oIQ5Ywl
— News18Lokmat (@News18lokmat) December 27, 2021
दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून तीव्र निषेध केला आहे.
रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी @JalgaonPolice pic.twitter.com/IuHHp86RBw
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 27, 2021
'रोहिणी खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो. जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी' अशी मागणी चाकणकर यांनी केली.
मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद विकोपाला
दरम्यान, जळगावात शिवसेना राष्ट्रवादी यांचा वाद चांगलाच विकोपाला गेला असून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपनंतर मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना चोप देण्याचे वक्तव्य करणाऱ्या रोहिनी खडसे यांना अटक करा व परस्पर विरोधी दाखल गुन्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक करा या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे यांचा विरोधात घोषणाबाजी करत परस्पर विरोधी दाखल गुन्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अद्याप पर्यंत अटक का केली नाही याचा देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारत पोलिसांना घेराव घातला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.