नवी मुंबई, 12 डिसेंबर : नवी मुंबईतील (navi mumbai) पामबीच मार्गावर ( palm beach road) भीषण अपघात घडला आहे. रिक्षा (auto rickshaw) चालकाला वाचवण्याच्या नादात भरधाव वेगात असलेली फॉर्च्युनर कार ( Fortuner car ) डिव्हायडरवर आदळून पलटी झाली. या भीषण अपघातात 7 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील सिवूड सिग्नलजवळ संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. बेलापूरकडून सीवूड्सच्या दिशेने एका रिक्षा जात होती. पण सिवूड जवळ आली असताना सिग्नल लागलेले होते, परंतु रिक्षाचालकाने रिक्षा न थांबवता तसाच पुढे निघाला.
नवी मुंबईमध्ये फॉर्च्युनर कार आणि रिक्षाचा भीषण अपघात pic.twitter.com/xX371NiqZP
— News18Lokmat (@News18lokmat) December 12, 2021
त्याचवेळी सिग्नल लागल्याचे पाहून एक फॉर्च्युनर कार अतिशय वेगाने विरुद्ध दिशेने म्हणजे वाशीकडून बेलापूरच्या दिशेने येत होती. समोरून रिक्षा येत असल्याचे पाहून फॉर्च्युनर चालकाने कारला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण फॉर्च्यूनर कार डाव्या बाजूला डिव्हायडरला धडकली. कारचा वेग जास्त असल्यामुळे डिव्हायडरला धडक दिल्यानंतर विरुद्ध दिशेला 3 ते 4 पलटी मारली आणि शंभर मीटर अंतरावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, याच फॉर्च्युनरचा अक्षरश: चुराडा झाला. पण रिक्षाला मोठी हानी झाली नाही. रिक्षाची समोर काच फुटली आणि किरकोळ नुकसान झाले.
ओमायक्रॉन नाही भीतीने कुटुंब संपलं; पत्नी-मुलांचा मारेकरी डॉक्टरची मिळाली माहिती
फॉर्च्युनर कारमध्ये 5 जण प्रवास करत होते. तर रिक्षामध्ये दोघे जण होते. या अपघातात दोन्ही वाहनातील सर्व जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहनं बाजूला केली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहनं बाजूला हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.