• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • वैद्यकीय व्यवस्थेविरोधात माजी केंद्रीय मंत्र्यांचा संताप, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

वैद्यकीय व्यवस्थेविरोधात माजी केंद्रीय मंत्र्यांचा संताप, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता अनेक ठिकाणी बेड्स, वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे.

  • Share this:
हैदर शेख, News 18 लोकमत, चंद्रपूर चंद्रपूर, 16 एप्रिल: माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अव्यवस्थेविरोधात धरणे आंदोलन केले. अहिर यांनी वेळोवेळी प्रशासनाला कोविड (Covid) उपाययोजनांबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र त्यावर अंमल न झाल्याने ही परिस्थिती ओढविल्याचे सांगत  जिल्हाधिकारी कार्यालय हिरवळीवर त्यानी एकट्यानेच धरणे दिले. बेडस (Hospital beds)- ऑक्सिजन (Oxygen)- रेमडेसिवीर (Remdesivir)-व्हेंटिलेटर पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा निषेध त्यांनी तिखट शब्दात व्यक्त केला. तातडीने डॉक्टर्स नेमणूक-इमारत अधिग्रहणाची मागणी करत 400 बेड्सचे रुग्णालय तयार असताना ते रिकामे ठेवल्याविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या. तासभर धरणे आंदोलन करत त्यांनी  सरकारला प्रतिकात्मक इशारा दिला मात्र स्थिती न सुधारल्यास मोठ्या आंदोलनाला तयार असल्याचे प्रतिपादन केले. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातील महत्वाचे मुद्दे 1) जी.एम.सी. महिला रूग्णालयात सेन्ट्रल ऑक्सिजन सिस्टम वेन्टीलेटर आय.सी.यू. च्या व्यवस्थेसह 400 बेड उपलब्ध असतांना ते त्वरीत सुरू करावे. 2) डॉक्टर्सची कमी सेवाभावी आ.एम.ए. शी चर्चा करून फिजीशीयन MSBS डॉक्टर्सची गरज आहे ती विनंतीवर मागणी करावी सहकार्य घ्यावे. 3) जिल्ह्यातील प्रमुख शहरातील चंद्रपूर महानगरासह खाजगी रुग्णालये बालरोग रुग्णालयासह अधिग्रहण करावे. 4) वेकोलीचे माजरी, घुग्घुस, बल्लारपूरचे 3 हॉस्पिटल कोविड-19 साठी त्वरीत अधिग्रहन करावे. वेकोली देण्यास तयार आहे. वाचा: धक्कादायक! डॉक्टर आणि वॉर्डबॉयच करत होते Remdesivir चा काळाबाजार, नागपूर पोलिसांनी केला पर्दाफाश 5) लालपेठ हॉस्पिटल वेकोलीचे सामान्य रुग्णालयातील एक विभाग शिफ्ट करून त्याजागी कोवीड-19 बेड वाढवा. 6) रेमडेसिवीर इंन्जेक्शनची कमतरता भासणार नाही अधिक मागणी करून उपलब्ध करून घ्यावे. 7) जेष्ठ डॉक्टरांसह BAMS / BHMS व अन्य प्रॅक्टीसनर डॉक्टर्सना कोवीड-19 च्या सेवेसाठी मदत घ्यावी. 8) होम आयसोलेट परिवार व रुग्णांसाठी खोल्यांची अडचन पाहता मंगल कार्यालये, वस्तिगृह, शाळा अन्य अधिग्रहन करून गरीब कुटूंबांना व्यवस्था करून द्यावी. महानगरपालिकेने पुढाकार घेणे जरूरी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब असली तरी जिल्हा प्रशासनाला तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे.
First published: