Home /News /maharashtra /

शिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार

शिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार

कामतघर परिसरता शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी गुरुनाथ पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भिवंडी, 27 सप्टेंबर: भिवंडी शहरातील कामतघर शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील (वय- 68 ) यांची निर्घृण हत्या झाली आहे. धक्कादायक म्हणजे गुरूनाथ पाटील यांनी हत्या पोटच्या मुलानं केली आहे. हे हत्याकांड कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती मिळाली आहे. ब्रिजेश पाटील असं हत्या करणाऱ्या मुलाचं नाव असून त्याला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. हेही वाचा...भाजपचे नेते गिरीश महाजनांच्या गाडीला अपघात, आरोग्यसेवक गंभीर जखमी मिळालेली माहिती अशी की, गुरुनाथ पाटील हे आपल्या घरात झोपले असताना ब्रिजेश याने मटण कापण्याच्या सुऱ्यानं वडिलांच्या मान आणि तोंडावर सपासप वार केले. यात गुरुनाथ पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला. गुरुनाथ पाटील यांचे त्यांच्या मुलांसोबत वर्षभरापासून कौटुंबीक वाद होते. त्याबाबत गुरुनाथ पाटील यांनी वेळोवेळी नारपोली पोलिसांकडे मुलाविरोधात तक्रार केली होती. परंतु पोलिसांना आरोपी मुलाला त्याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून त्याला सोडून दिलं होतं. त्याच मुलानं गुरूनाथ पाटील यांची आज हत्या केली आहे. नारपोली पोलिसांनी हत्येच्या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहेय दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलगा ब्रिजेश पाटील याला अटक केली असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा......तर सगळ्याच समजाचं आरक्षण रद्द करा, खासदार उदयराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर... गुरूनाथ पाटील यांनी मुलाविरोधात नारपोली पोलिसांत वारंवार तक्रार केली होता. मात्र, पोलिसांनी आरोपी ब्रिजेश याच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून त्याला सोडून दिलं होतं. पोलिसांनी आरोपीवर गंभीर कारवाई केली असती तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी दिली आहे. दरम्यान, कामतघर परिसरता शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी गुरुनाथ पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Murder news, Shiv sena

पुढील बातम्या