मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक: माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भाचे सून पराभूत, एका चिठ्ठीमुळे अपयश

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक: माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भाचे सून पराभूत, एका चिठ्ठीमुळे अपयश

Maharashtra Gram Panchayat election Result: जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील नाडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाचे सून उभ्या होत्या.

  • Published by:  News18 Desk

जळगाव, 18 जानेवारी: राज्यात 15 जानेवारीला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी मतमोजणी सुरू झाली. बहुतेक ठिकाणचे कल हाती आले आहेत. आता राज्यातील मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणूक निकालात मतदार राजाने अनेक दिग्गज नेत्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. तर अनेक अपक्ष उमेदवारांच्या पारड्यात भरभरून मतं दिली आहे. त्यामुळे यंदाची ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची ठरली आहे. या निवडणूकीत भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाचे सूनेलाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण त्यात थोडा नशिबाचा भागच जास्त होता.

महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात निवडणुकांची धामधूम सुरू होती. आज त्याची सांगता होते आहे. राज्याच्या 34 जिल्ह्यांतल्या  14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील नाडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाचे सून उभ्या होत्या. ईश्वर चिठ्ठीमुळे निवडणुकीचा निकाल त्यांच्या विरोधात लागला आहे. दोन उमेदवारांना समसमान मतं मिळाल्यास अशा प्रकारे चिठ्ठी पाडून विजयी उमेदवार घोषित केला जातो.

प्रतिभाताई पाटील यांच्या भाचे सून रंजनकौर वीरेंद्रसिंह पाटील यांना आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी योगिता श्रीकृष्ण लासुनकर यांना एकसमान मतं मिळाली होती. या दोघींना प्रत्येकी 217 मतं मिळाली होती. त्यामुळे ही निवडणूक कोणी जिंकली? हा पेच गावकऱ्यांसमोर निर्माण झाला होता.

त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी ईश्वर चिठ्ठी पद्धतीचा वापर करण्यात आला. यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाचे सून रंजनकौर वीरेंद्रसिंह पाटील यांचा पराभव झाला आहे. अवघ्या एका मताने खरं तर त्या चिठ्ठीने त्यांचा घात केला आहे. त्यांना निवडणुकीत आणखी एक मत जास्तीचं मिळालं असतं तर, त्यांचा विजय पक्का होता. मात्र एकसमान मतं आणि त्यानंतर वापरलेली ईश्वर चिठ्ठी ही पद्धत यामुळे त्यांचा पराभव झाला आहे. रंजनकौर पाटील यांचे पती आणि प्रतिभाताई पाटील यांचे भाचे वीरेंद्र सिंह पाटील हे भुसावळचे माजी सभापती आहेत.

First published:

Tags: Gram panchayat, Jalgaon