सोलापूर, 14 जून: कोरोनाची लागण झाल्यामुळे सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार युनूस शेख यांचं रविवारी सकाळी निधन झालं. युनूस शेख यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच युनूस शेख यांची प्राणज्योत मालवली. युनूस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. या घटनेने सोलापूरसह राज्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा...धक्कादायक! होम क्वारंटाईन न राहता फिरले शहरभर, 4 कोरोनाबाधित रुग्णांवर गुन्हा
युनूस भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार होते. युनूस शेख यांनी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना सोलापुरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यात रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास युनूस शेख यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती माजी महापौर मनोहर सपाटे यांनी दिली आहे.
1969, 1975 आणि 1985 साली तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. 1992 झाली ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. मात्र, 1998 साली सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा.. कोविड हॉस्पिटलमध्ये शिरलं पूराचं पाणी, समोर आला अंगावर काटा उभा करणारा VIDEO
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोलापूर शहरात शनिवारी कोरोनाचे 41, तर ग्रामीण भागात 6 रुग्ण आढळले. तसेच शहरातील 6 जणांचा, तर ग्रामीण भागातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 1 659 वर पोहचली आहे. आतापर्यंत सोलापूरमध्ये 143 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 836 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.