मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

झुंज अयपशी, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांचं कोरोनामुळे निधन

झुंज अयपशी, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांचं कोरोनामुळे निधन

आज 12 वाजेच्या दरम्यान त्यांचं निधन झालं आहे. राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांचे ते मेहुणे...

आज 12 वाजेच्या दरम्यान त्यांचं निधन झालं आहे. राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांचे ते मेहुणे...

आज 12 वाजेच्या दरम्यान त्यांचं निधन झालं आहे. राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांचे ते मेहुणे...

  • Published by:  sachin Salve

किशोर गोमासे, प्रतिनिधी

वाशिम, 10 मे : महाराष्ट्रात कोरोना (Corona) व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वसामान्यसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार आणि कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके (Prakashdada Dahake ) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

प्रकाश डहाके ( वय 67 ) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे लागण झाली होती. त्यांच्यावर मागील आठवड्याभरापासून नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज 12 वाजेच्या दरम्यान त्यांचं निधन झालं आहे. कोविड मधून शनिवारी बरे झाले होते त्यांची चाचणी सुद्धा निगेटिव्ह आली होती. मात्र आज 12 वाजेच्या दरम्यान रक्तदाब कमी होऊन हृदय विकाराचा झटका आला होता, त्यात त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार कारंजा इथं करण्यात येणार आहे.  राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांचे ते मेहुणे आहेत.

निवडणुकीतील पराभवानंतर पार पडली काँग्रेसची बैठक, पक्षात मोठ्या बदलाचे दिले संकेत

प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा 1995 मध्ये कारंजा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती.त्यानंतर 1999 मध्ये ही त्यांनी आपले नशीब आजमावले.2004 मध्ये त्यांनी भारिप च्या तिकिटावर निवडणूक लढविली मात्र त्यामध्ये ते पराभूत झाले.

पुनः ते 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आणि आमदार म्हणून निवडून आलेत. 2014 च्या विधानसभा निवडणूकित ते अपक्ष म्हणून निवडणूकित उतरले, मात्र त्यांचा त्यात पराजय झाला. त्यांनंतर 2019 च्या निवडणुकीत पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले तेव्हाही त्यांचा पराजय झाला. प्रकाश डहाके हे राजकारणातील धुरीण मानले जात असून त्यांना दादा या नावानेच ओळखल्या जाते. प्रकाश डहाके यांना देवव्रत आणि कौस्तुभ असे दोन मुले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रध्दांजली

वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाशदादा डहाके यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रकाशदादा डहाके यांच्या निधनानं ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेलं, शेतकरी, कष्टकरी बांधवांची दु:ख दूर करण्यासाठी तळमळीनं कार्य करणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे.

उजणीचं पाणी पेटलं, मंत्र्यासमोरच सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी भिडले, LIVE VIDEO

प्रकाशदादांचं निधन ही कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाची, वाशिम जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक चळवळीची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे. मी स्वर्गीय प्रकाशदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्वजण डहाके कुटुंबीयांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

First published:

Tags: राष्ट्रवादी, वाशिम