मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जळगावात राष्ट्रवादीला धक्का, माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश

जळगावात राष्ट्रवादीला धक्का, माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश

 भाजपचे नेते आणि संकटमोचक गिरीश महाजन (girish mahajan) यांची खेळी पुन्हा एकदा यशस्वी राहिली आहे.

भाजपचे नेते आणि संकटमोचक गिरीश महाजन (girish mahajan) यांची खेळी पुन्हा एकदा यशस्वी राहिली आहे.

भाजपचे नेते आणि संकटमोचक गिरीश महाजन (girish mahajan) यांची खेळी पुन्हा एकदा यशस्वी राहिली आहे.

  • Published by:  sachin Salve

जळगाव, 08 नोव्हेंबर : माजी मंत्री एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपमध्ये (bjp) प्रवेश केल्यानंतर भाजपला मोठी गळती लागली होती. पण आता स्थानिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अशातच भाजपने राष्ट्रवादीला (ncp) मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचे नेते आणि संकटमोचक गिरीश महाजन (girish mahajan) यांची खेळी पुन्हा एकदा यशस्वी राहिली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अरुण पाटील (arun patil) यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. अरुण पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अरुण पाटील हे रावेर मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. गिरीश महाजन यांच्या खेळीमुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.

जमीन हडपण्यासाठी सुनेनं केला सासूचा खून, हतबल पतीच्या डोळ्यांदेखल केले वार

विशेष म्हणजे, मागील महिन्यात जळगावात भाजपचा शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. राष्ट्रवादीसोबत एकनाथ खडसे यांनाही धक्का मानला जात आहे.  मुक्ताईनगर तालुक्यातील भाजपातून एकनाथ खडसे यांच्यासमवेत राष्ट्रवादीत गेले अनेक पदाधिकाऱ्यांची घरवापसी झाली आहे.  माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील 25 ते 26 खडसे समर्थकांनी भाजपात घरवापसी केली होती.

जिल्हा बँक निवडणुकीत भाजपची पिछेहाट

तर दुसरीकडे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुक बिनविरोध करण्याचे ठरले असताना अर्ज भरण्याच्‍यावेळी चारही प्रमुख पक्षांनी अर्ज दाखल केले. यानंतर आजच्‍या माघारीच्‍या अंतिम दिवशी देखील नाट्यमय घडामोडी पाहण्यास मिळाली असून या निवडणुकीतून भाजपची पिछेहाट झाली आहे. जिल्‍हा बँक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. त्यामुळे आता बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजकुमार राव-पत्रलेखाचं ठरलं ! पारंपारिक पद्धतीने करणार लग्न, तयारी सुरू

भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जाहीर करत आमचे सर्व उमेदवार हे अर्ज माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केले. 'जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय पॅनल तयार करून उमेदवार निवडून दिले होते. आताच्या निवडणुकीसाठी असेच प्रयत्नांमध्ये सर्व पक्षांसोबत होतो. जागा वाटपापर्यंत चर्चा झाली होती. मात्र ऐनवेळी अन्य पक्षांनी विश्वासघात केला. मात्र आम्हाला गाफील ठेऊन बाकिच्यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्या. दोन महिने बैठका सगळे ठरलेले असताना शेवटच्‍या दिवशी युटर्न घेतला. दडपशाही करून भाजपच्‍या सर्व उमेदवारांचे अर्ज रिजेक्‍ट केले. सगळ्या ठिकाणी दडपशाही झाली. नावे ठरले असताना विश्‍वासघात केला. याचा निषेध म्‍हणून भाजपच्‍या सर्व उमेदवारांनी माघारी घेत निवडणुकीवर बहिष्‍कार टाकत असल्‍याचे महाजन यांनी स्‍पष्‍ट केले.

First published:

Tags: BJP, Girish mahajan, NCP