BREAKING : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने भर वस्तीत केला गोळीबार

BREAKING : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने भर वस्तीत केला गोळीबार

साताऱ्यातील पारंगे चौकाजवळ भर वस्तीमध्ये किरकोळ कारणावरून माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली.

  • Share this:

किरण मोहित, प्रतिनिधी

सातारा, 21 नोव्हेंबर : साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने भर वस्तीत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून नगरसेवकाने हवेत गोळीबार केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या गोळीबारामध्ये कोणातीही जीवित हानी झाली नसून आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. भर वस्तीमध्ये अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

साताऱ्यातील  पारंगे चौकाजवळ भर वस्तीमध्ये किरकोळ कारणावरून माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. सुमारे साडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे साताऱ्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या माजी नगरसेवक महेश जगताप याला अटक केली आहे. त्याचा साथीदार गोळे (पूर्ण नाव समजले नाही) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महेश जगताप हे शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या- मरताना वहिनीने दिला धक्का, माझ्या मुलीचा खरा बाप तूच हे भावाला सांग!

पारंगे चौकातील एका इमारतीत असणाऱ्या दोन व्यावसायिकांच्यामध्ये पार्किंगवरून वाद होत होता. त्यातील एका व्यावसायिकाने याची माहिती महेश जगताप यांना दिल्यानंतर त्याने पारंगे चौकाजवळ जगतापच्या घरासमोर हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे घटनास्थळी दाखल झाले होते.

इतर बातम्या - देवा! खात्यातून काढत होता कोणा दुसऱ्याचे पैसे, म्हणाला- मला वाटलं मोदींनी टाकले

संशयित पळून जाऊ नयेत, म्हणून पोलिसांनी पारंगे चौकातून बाहेर जाणारे सर्व रस्ते बंद करून घटनास्थळावरून माहिती घेतली. त्यानंतर संशयित जगताप याला त्याच्या घरातूनच पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, सातारा बस स्थानकाकडून जिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पारंगे चौकाजवळ ही घटना घडल्यामुळे खळबळ माजली. रस्त्यावरून नेहमी मोठी रहदारी असते. घटना घडल्यानंतर अनेक मान्यवरांसह अनेकांनी परिसरात गर्दी केली होती.

इतर बातम्या - 'रड्या ऑफ द ईयर अवार्ड संज्यालाच दिला पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 09:57 PM IST

ताज्या बातम्या