Home /News /maharashtra /

माजी आमदाराच्या भावाचा आणि माजी महापौराचा एकमेकांवर गोळीबार, मालेगाव हादरलं

माजी आमदाराच्या भावाचा आणि माजी महापौराचा एकमेकांवर गोळीबार, मालेगाव हादरलं

शहरातील माळदे शिवारात असलेल्या जमिनीचा वाद या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे

शहरातील माळदे शिवारात असलेल्या जमिनीचा वाद या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे

शहरातील माळदे शिवारात असलेल्या जमिनीचा वाद या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे

मालेगाव, 08 जानेवारी : नाशिक (nashik) जिल्ह्यातील मालेगावमध्ये (malegaon) जमिनीच्या वादातून (land dispute cases) माजी आमदाराच्या भावाने  आणि माजी महापौर अब्दुल मलिक युनूस (Former Mayor Abdul Malik Yunus) यांनी एकमेकांच्या दिशेने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मालेगावात खळबळ उडाली आहे. मालेगाव आज पुन्हा गोळीबाराने हादरले असून जमिनीच्या वादातून माजी आमदाराचा भाऊ खालील शेख आणि माजी महापौर अब्दुल मलिक यांनी एकमेकांच्या दिशेने हवेत गोळीबार केल्याचा आरोप दोघांनी केला आहे. शहरातील माळदे शिवारात असलेल्या जमिनीचा वाद या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या वादातून आज हा गंभीर प्रकार घडला. सुदैवाने या गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नाही. (Night curfew Maharashtra : उद्यापासून काय राहणार बंद, काय सुरू? संपूर्ण नियमावली) या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवीसह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी घटनास्थळी 1 जिवंत तर 1 फायर केलेला काडतूस मिळाले आहे. दोघांनी परस्परविरोधी तक्रार दिल्या असून त्यावरून पवारवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दुचाकीचा धक्का लागल्यामुळे तरुणाची हत्या दरम्यान, रस्त्याने जात असताना दुचाकीचा धक्का लागल्याने झालेल्या वादात 3 तरुणांनी मिळून एकाची हत्या (murder) केल्याची घटना नागपूरमधील (nagpur) हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जितेंद्र चोपडे असं मृत तरुणाचे नाव आहे. जितेंद्र चोपडे हा आपल्या मित्रांसोबत त्रिमूर्ती धाब्यावर शुक्रवारी रात्री जेवण करायला गेला होता. जेवण करून घरी परत येत असताना जितेंद्र हा गाडी चालवत होता, तर त्याचे दोन मित्र पाठीमागे बसले होते. घरी येत असतांना चंद्रकिरण नगर गल्ल मध्ये आरोपी विजय उगरेजा व रवी उगरेजा यांच्या गाडीला जितेंद्रच्या गाडीचा धक्का लागला. यावरून दोन्ही गटात वाद झाला. आरोपी  विजय उगरेजाने गाडीच्या किचनला असलेला चाकू काढून जितेंद्रच्या छातीवर वार केले. वाद सोडवायला धावलेल्या मित्रांवर देखील विजयने हल्ला चढवला. या हल्ल्यात जितेंद्र गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता,  डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेत एका विधी संघर्ष बालकासह दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या