Home /News /maharashtra /

भाजपला मोठा धक्का, माजी आमदार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपला मोठा धक्का, माजी आमदार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

त्यामुळे आता येणाऱ्या काळात काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू होणार असल्याचे दिसत आहे.

अमरावती, 17 जून : एकीकडे राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याबद्दल नारेबाजी सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपला (BJP) अमरावतीमध्ये (Amravati) मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख (Sunil Deshmukh) यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सुनील देशमुख हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का देत भाजपचे माजी आमदार डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे आता निश्चित झाले आहे. 19 जून रोजी मुंबई येथील टिळक भवनात प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती स्वतः सुनील देशमुख यांनी दिली आहे. चिंताजनक! महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा अधिक धोका कोणत्याही अटी शिवाय प्रवेश करत असल्याची कबुली स्वतः डॉ. सुनील देशमुख यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नुकतेच अमरावतीमध्ये येऊन गेले होते. याच दरम्यान नाना पटोले व सुनील देशमुख यांची चर्चा झाली व या चर्चेतच सुनील देशमुख यांची घरवापसी निश्चित झाली. त्यामुळे आता येणाऱ्या काळात काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू होणार असल्याचे दिसत आहे. सुनील देशमुख हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले होते. 1999 ते 2004 या काळात काँग्रेस आमदार होते. तसंच 2004 ते 2009 दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम व अर्थराज्यमंत्रिपद भुषवले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची साथ सोडून देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि अमरावती विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरूच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) यांनी अकोल्याचे  शेतकरी मुरलीधर राऊत (Murlidhar raut) यांचं मन की बात कार्यक्रमातून (Mann Ki Baat) तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यांनी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 'नवीन आयटी कायद्यांचं पालन करण्यात ट्विटर अपयशी, कायदेशीर संरक्षण' संपुष्टात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी मुरलीधर राऊत यांच्या हॉटेल मराठामध्ये प्रवेश सोहळा पार पडला. बाळापूर तालुक्यातील पारस फाट्यावर हॉटेल मराठा नावाने त्यांचं हॉटेल आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 नोव्हेंबर 2016 मध्ये मन की बात या कार्यक्रमात राऊत यांचं कौतुक केलं होतं. नोटबंदीच्या काळात राऊत यांनी पैसे नसणाऱ्या अनेक लोकांना मदत केली होती. महामार्गावरून ये जा करणाऱ्यांना त्यांनी आपल्या हॉटेलमधून मोफत जेवण दिलं होतं. त्यांच्या या कार्याची पंतप्रधान मोदींनी दखल घेतली होती.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या