मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे निधन, काही दिवसांपूर्वी केली होती कोरोनावर मात

भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे निधन, काही दिवसांपूर्वी केली होती कोरोनावर मात


जगन्नाथ ढोणे हे एम. एस. सर्जन होते. त्यांनी डॉक्टरकीसह राजकारणातही आपला ठसा उमटवला होता.

जगन्नाथ ढोणे हे एम. एस. सर्जन होते. त्यांनी डॉक्टरकीसह राजकारणातही आपला ठसा उमटवला होता.

जगन्नाथ ढोणे हे एम. एस. सर्जन होते. त्यांनी डॉक्टरकीसह राजकारणातही आपला ठसा उमटवला होता.

  • Published by:  sachin Salve
अकोला, 27 ऑक्टोबर : भारतीय जनता पक्षाचे (BJP)आणि माळी समाजाचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे (Dr Jagannath Dhone) यांचं सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी 12.30 वाजता पातूर येथील डॉ. वंदनताई जगन्नाथराराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जगन्नाथ ढोणे हे एम. एस. सर्जन होते. त्यांनी डॉक्टरकीसह राजकारणातही आपला ठसा उमटवला होता. डॉ. जगन्नाथ ढोणे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. उपचाराअंती ढोणे यांनी कोरोनावर मात मिळविली होती. wifi मध्ये अडथळे येतात? या सोप्या ट्रिक्सनी इंटरनेट होईल सुपरफास्ट अकोट विधानसभा मतदारसंघातून ढोणे हे शिवसेनेचे आमदार होते. 1990 साली डॉ. जगन्नाथ सिताराम ढोणे यांनी अकोट मतदारसंघातून शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेस उमेदवार सुधाकर गणगणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर 1995 साली ढोणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.  1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर विदर्भाच्या प्रश्नी लढा दिला होता. डॉ. ढोणे हे राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक होते. परंतु, त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर प्रदेश कार्यकारणी सदस्य, अकोला जिल्हा भाजप सिंचन परिषदेचे संयोजक अशी जबाबदारी सोपवली होती. कोरोनाने थैमान घातलेल्या मुंबईसाठी दिलासादायक बातमी, नवी आकडेवारी आली समोर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. वयाच्या 60 वर्षांनंतरही ते भाजपात सक्रिय नेते होते. नुकताच रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या निधनामुळे पातूरवर शोककळा पसरली आहे.
First published:

Tags: Akola, BJP, अकोला

पुढील बातम्या