'शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासह कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करा'

'शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासह कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करा'

बीड जिल्ह्यातील जनतेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांना होम क्वारंटाईन करुन त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवावे

  • Share this:

बीड, 4 एप्रिल: कोरोना विषाणूचे शेकडो रुग्ण असलेल्या मुंबईहून शनिवारी बीड येथे आलेले शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्यालह त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करा. त्यांच्यापासून बीड जिल्ह्यातील जनतेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करुन त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा..महालक्ष्मीचं मंगळसूत्र तुटलं.. 22 हजार महिला होणार विधवा; सोशल मीडियावर अफवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन, जिल्हाबंदी, सीमा बंदी ,संचारबंदी, जमावबंदी असताना कुठली परवानगी न घेता शनिवारी जयदत्त क्षीरसागर व त्यांचे कुटुंब मुंबईहून बीड येथे खासगी वाहनाने आले. त्यांना कायद्याचं बंधन नाही का, सामान्यांना वेगळा न्याय आणि यांना वेगळा न्याय का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.  आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना देण्यात आली आहे.

हेही वाचा...लॉकडाउन संपण्याआधी रेल्वेनं सुरू केली 'ही' तयारी, 15 एप्रिलनंतर काय होणार?

दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजी मंत्री भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर संचारबंदी उल्लंघन केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू संपूर्ण देशासह राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...देश कोरोनाने हादरलाय पण एक शहर जिथं साधा संशयित रुग्ण नाही, काय केलं लोकांनी?

बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच आमदार सुरेश धस हे बीड जिल्ह्याच्या सीमा ओलांडून त्यांच्या मदतीसाठी भिगवण (जि.पुणे) येथे गेले होते. यावरुन आमदार धस यांच्यावर संचारबंदीचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. एखाद्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही राज्यात पहिलीच घटना आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे भाजप कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे .आता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: beed news
First Published: Apr 4, 2020 06:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading