Home /News /maharashtra /

जळगाव हादरलं, माजी महापौराच्या मुलाची स्मशानभूमीजवळ निर्घृण हत्या

जळगाव हादरलं, माजी महापौराच्या मुलाची स्मशानभूमीजवळ निर्घृण हत्या

राकेशचा मोठा भाऊ राजू याचा गुरुवारी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाची तयारी करण्यात आली होती.

जळगाव, 05 नोव्हेंबर : जळगाव शहरात (Jalgaon) माजी महापौर (mayor) अशोक सपकाळ यांचा मुलगा राकेश सपकाळे (Rakesh Sapkale) याची शिवाजीनगर परिसरात निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश सपकाळे (वय 28) यांच्यावर रात्री 11.30 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ हल्ला करण्यात आला केला. राकेश सपकाळे हा स्मशानभूमी परिसरातून येत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्याला अडवले. या तरुणांनी सुरुवातीला त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मारेकर्‍यांनी चाकूने राकेशच्या गळ्यावर, मांडीवर  सपासप वार केले. त्यामुळे राकेश रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. धमकी दिल्या प्रकरणी भाजपचे माजी खासदार संजय काकडेंना अटक आणि जामीन या घटनेनंतर स्थानिकांनी जखमी अवस्थेत राकेशला खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तपासणी करुन डॉक्टरांनी राकेश याला मृत घोषित केले. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. राकेशचा मोठा भाऊ राजू याचा गुरुवारी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाची तयारी करण्यात आली होती. वाढदिवसाचे होर्डिंगसह राकेश आपला दुसरा भाऊ सोनू आणि त्याच्या मित्रांसोबत घरी जात होता. त्यावेळी हल्लेखोरांनी वाटेत गाठून हल्ला केला. धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात गोरखधंदा! भगवान बाबा आश्रमशाळेत काल्पनिक विद्यार्थी राकेश आणि त्याच्या भावासोबत शनिपेठेतील काही तरुणांचे आधी भांडण झाले होते. अलीकडेच पुन्हा एकदा या तरुणांसोबत राकेशचा वाद झाला होता. यात लाडू गँगचे नाव समोर आले आहेय   गणेश आणि आकाश उर्फ भुर्‍या या दोन तरुणांची नाव समोर आली आहे. पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.  या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या