सुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट!

जैन यांच्यावर अधिकच्या उपचारांची गरज असल्याने त्यांना मुंबईला शिफ्ट करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 09:19 PM IST

सुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट!

प्रशांत बाग नाशिक 22 ऑक्टोंबर : जळगाव घरकूल घोटाळ्यातले आरोपी असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. जैन यांची हार्ट सर्जरी झाली होती. त्याच बरोबर त्यांना अनेक आजारही आहेत. आज त्यांना कारागृहात अस्वस्थ वाटू लागल्यानंतर नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. त्यांची शुगर वाढल्यानं ते बेशुद्ध पडले होते.  त्यांना उच्च रक्तदाब,  छातीत वेदनेचा त्रास जाणवत होता. जैन यांच्यावर अधिकच्या उपचारांची गरज असल्याने त्यांना मुंबईला शिफ्ट करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. परवानगी मिळाल्यानंतर जैन यांना मुंबईत जेजे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येईल अशी माहितीही दिली जातेय. जैन हे जळगांव घरकुल घोटाळा प्रकरणात कारागृहात असल्याने त्यांना परवानगीनंतरच हलविण्यात येऊ शकते.

ड्रग्ज् तस्करांकडून पैसे घेऊन पोलीस स्टेशनमध्येच ठेवले, पाच पोलिसांना अटक

सप्टेबर महिन्यात सुरेश जैन आणि इतर आरोपींना घरकुल घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 3 सप्टेंबरला माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांच्यासह 38 आरोपींची अखेर नाशिकच्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती.  घरकुल प्रकरणात 48 दोषींना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. 48 पैकी 38 आरोपींची धुळे कारागृहातून नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणातले 10 आरोपी  जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.

आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन, राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, चोपड्याचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सर्व 48 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले होते. नंतर विशेष जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी सुरेश जैन यांना 7 वर्षांचा कारावास आणि 100 कोटींचा दंड ठोठावला. गुलाबराव देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आला. तर माफीच्या साक्षीदार सिंधू विजय कोल्हे यांची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या घोटाळ्यातील दोषी प्रदीप रायसोनी 7 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख दंड, राजेंद्र मयूर आणि जगन्नाथ वाणी यांना 7 वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 40 कोटींपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. सर्व संशयित 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...