गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या. मात्र धाडी सत्रानंतरही देशमुख ईडीसमोर हजर राहिले नाहीत. ईडीनं अनिल देशमुखांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. ईडीनं त्यांना अनेकदा समन्स बजावलं मात्र ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते. सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत. अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीनं वारंवार समन्स बजावलं होतं. अनिल देशमुखांच्या खास माणसाला CBI ने केली ठाण्यात अटक रविवारी 100 कोटी वसुली प्रकरणी ठाण्यात (thane) कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातून सीबीआयने (cbi) एका व्यक्तीला अटक केली आहे. ही व्यक्ती अनिल देशमुख यांच्या जवळचा माणूस असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 100 कोटी वसुली प्रकरणाची लिंक आता ठाण्यात पोहोचली आहे. ठाण्यातून सीबीआयने संतोष शंकर जगताप (Shankar Jagtap ) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. हेही वाचा- T20 World Cup: IPL स्टार राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फेल, दोन्हीच्या आकडेवारीत मोठा फरक ठाण्यातील वसंत विहार इमारतीतून जगतापला अटक करण्यात आली आहे. 22 व्या मजल्यावर जगताप राहत होता. दरवाजा उघडत नसल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून अटक केली. ही संपूर्ण कारवाई शनिवारी मध्यरात्री झाली. त्याच्याकडून 9 लाख रुपये जप्त करण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. शंकर जगताप हा अनिल देशमुख यांच्या खास व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयने जगतापला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे. 4 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.Mumbai | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrives at the office of the Enforcement Directorate to join the investigation in extortion and money laundering allegations against him pic.twitter.com/qF1p1aGW11
— ANI (@ANI) November 1, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, NCP