अब्दुल सत्तारांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली 'ही' जबाबदारी!

अब्दुल सत्तारांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली 'ही' जबाबदारी!

भाजपच्या महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्र्य़ांसोबत रथात दिसणाऱ्या सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचा विचार सोडून देत शिवसेनेची वाट धरली आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

मुंबई, 02 सप्टेंबर : काँग्रेसचे बंडखोर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज दुपारी 12.30 वाजता खुद्द उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर सत्तारांना शिवबंधन बांधलं. भाजपच्या महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्र्य़ांसोबत रथात दिसणाऱ्या सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचा विचार सोडून दित सेनेचं शिवबंधन हाती बांधलं आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सत्तार समर्थकांसोबत मुंबईमध्ये दाखल झाले होते. तर सिल्लोड हा त्यांचा मतदारसंघ निवडून देण्याची जबाबदारी ही सत्तार यांच्यावर देण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांवेळी सत्तार इतर जिल्ह्यांसाठीही काम करतील असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसभा निवडणुकांच्या आधी सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का अशा चर्चांणा उधान आलं होतं. अब्दुल सत्तार यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आलं होतं. अब्दुल सत्तार यांना सिल्लोड मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे काँग्रेस पक्षातून बडतर्फ केलेले अब्दूल सत्तार आता पुन्हा शिवसेनेची वाट धरली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे यात्रेच्या रथावर पहायला मिळाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. याआधी सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून भाजप कार्यकर्ते आणि सत्तारांमध्ये वादावादीदेखील झाली होती.

इतर बातम्या - ... तर राष्ट्रवादी दिसणारच नाही, अमित शहांचा पवारांवर घणाघात

माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनीही विखेंची भेट घेतली होती. त्यामुळे सत्तार विखेंसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. विखेंच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल, असेही महाजन त्यावेळी म्हणाले होते. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील, तो निर्णय आपल्याला मान्य असेल. त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं होतं.

इतर बातम्या - बहिणीची शेजारच्या मित्रासोबत सुरू होती Love Story, भावाने लावली प्रियकराची वाट!

लोकसभा निवडणुकीच्या आधी पुकारला होता बंड...

अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकावलं होतं. पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाहीतर त्यांनी सेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचीही भेट घेतली होती. परंतु, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तार यांनी आता भाजपची वाट निवडली होती. परंतु त्यांना भाजपमधून विरोध झाला.

VIDEO: आतापर्यंत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्या टॉप 18

Published by: Renuka Dhaybar
First published: September 2, 2019, 11:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading