अखेर राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

अखेर राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

गेल्या अनेक दिवसांपासून होणार होणार अशी चर्चा असेलल्या नारायण राणे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश झाला.

  • Share this:

कणकवली, 15 ऑक्टोबर: गेल्या अनेक दिवसांपासून होणार होणार अशी चर्चा असेलल्या नारायण राणे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश झाला. यासह राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि त्या पक्षातील सर्व पदाधिकारींनी भाजपमध्ये प्रवेश केला. कणकवली येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राणे यांनी शिवसेनेचा एकदा ही उल्लेख केला नाही.

प्रवेश केल्यानंतर काय म्हणाले नारायण राणे

- या दिवसाची फार दिवस मी वाट पाहत होतो की आमचा भाजपात कधी प्रवेश होईल

- फार विचार करून मी भाजपात प्रवेश केलाय

- शिवसेना, काँग्रेसमधून मी भाजपात आलोय

- आता भाजपाची विचारसरणी आणि आपले मार्गदर्शनावर आधारीतच मी भाजपात काम करेन

- मुख्यमंत्री साहेब तुमच्या नेतृत्वाखाली मला काम करायचे आहे

- आज पत्रकारना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले

- पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांचे आभार

- सिंधुदुर्गाचा, कोकणाचा विकास करता यावा यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला

- मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 5 वर्षात राज्याची प्रगती झाली

-नितेश राणे यांना मोठ्या मतांनी विजय करा

नारायण राणे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे आणि त्यांच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. नारायण राणेंच्या नेतृत्वाचा फायदा भाजपाला आणि सरकारलाही होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पत्रकार सातत्याने विचार होते राणे कधी भाजपमध्ये येणार. पण ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रवेशाचा हा कार्यक्रम आम्हाला मुंबईत करायचा होता. पण भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की हा कार्यक्रम सिंधुदुर्गातच व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानाच्या 65% मते नितेश राणेंना मिळतील हे लिहून ठेवा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विजयाची खात्री दिली. आक्रमकता हा नितेश राणेंचा स्वभाव कारण ते राणेंच्या शाळेत तयार झाले. पण नितेश आता आमच्या शाळेत त्यामुळे आता त्याना संयम बाळगण्याची गरज आहे. संयम आणि आक्रमकता असे दोन्ही गुण आता त्यांच्यात येतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. याचबरोबर येत्या दोन वर्षात सिंधुदुर्गात सी वर्ल्डचे राणेंचे स्वप्न पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

शिवसेनेबाबत पूर्ण मौन

राणे यांच्या प्रवेशासाठी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेबाबत पूर्ण मौन बाळगले. त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केला ना युतीचा उल्लेख केला.

'बाळ, तुझा पैलवान तयार आहे का?' शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं ओपन चॅलेंज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 02:25 PM IST

ताज्या बातम्या