मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपच्या माजी आमदाराचा MSEB कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न, थरारक VIDEO समोर

भाजपच्या माजी आमदाराचा MSEB कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न, थरारक VIDEO समोर

भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांनी आज गळफास घेत आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. कृषीपंप वीजतोड प्रकरणी रोष व्यक्त करताना बाळासाहेब मुरकुटे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर, 23 नोव्हेंबर : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांनी आज गळफास घेत आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. कृषीपंप वीजतोड प्रकरणी रोष व्यक्त करताना बाळासाहेब मुरकुटे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा (Nevasa) वीज वितरण कार्यालयात (MSEB) हा संबंध प्रकार घडला. संबंधित घटनेचा व्हिडीओदेखील आता समोर आला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ बघून काळजाचा ठोका चुकेल. बाळासाहेब मुरकुटे यांची सध्या प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

कृषी पंप वीजतोडी विरोधात भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. तीन तास ठिय्या आंदोलन करूनही मागणी मान्य होत नसल्याने भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे प्रचंड आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्या केल्यानंतर आपल्या आंदोलनाची दखल घेतली जाईल, या उद्विग्नतेतून त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मुख्य अभियंतासमोर हा सगळा प्रकार घडला.

हेही वाचा : भाजप आमदार जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला, LIVEO VIDEO

वारंवार तक्रारी करुनही दखल न घेतली गेल्याने टोकाचं पाऊल

शेतकऱ्यांचे कृषीपंपाची वीज कापली जात आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक काढता येत नाही. या विरोधात बाळासाहेब मुरकुटे यांनी वारंवार तक्रारी दिल्या होत्या. पण कुणीच दखल घेत नाही म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून जीवाला धोका नाही.

First published: