Home /News /maharashtra /

भाजपच्या माजी शहराध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या, अहमदनगरमध्ये खळबळ

भाजपच्या माजी शहराध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या, अहमदनगरमध्ये खळबळ

सुभाषचंद्र शिंदे यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही.

    अहमदनगर, 27 एप्रिल : अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील कोपरगाव येथील भाजपचे माजी शहराध्यक्ष प्राध्यापक सुभाषचंद्र शिंदे (Subhash Chandra Shinde) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. माजी खासदार स्वर्गीय सूर्यभान पाटील वहाडणे यांचे कट्टर समर्थक असलेले सुभाषचंद्र आनंदराव शिंदे यांनी आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली, असं वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे. Bank Privatisation चा ग्राहकांना काय फायदा होणार? RBI ने आखली महत्त्वाची योजना शिंदे यांनी आपल्या खोलीतून बराच वेळ झाले बाहेर न आल्यामुळे त्यांची सून वर्षा शिंदे यांनी डोकावून पाहिले असता, त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने कोपरगाव ग्रामीण पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुभाषचंद्र  शिंदे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. सुभाषचंद्र शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. IPL खेळण्यासाठी भारतात आलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा धक्का रुमची पाहणी केली असता एक सुसाईट नोट आढळून आली आहे. परंतु, या सुसाईट नोटमध्ये काय लिहिले आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी याबद्दल माहिती देण्याचे टाळले आहे. शिंदे यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. प्राध्यापक शिंदे हे भाजपचे माजी शहराध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचे राज्यातील अनेक भाजप नेत्यांसोबत चांगले संबंध होते. त्यांच्या आत्महत्येमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी, दोन नातवंडे असा परिवार आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या