भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू, Ducati scrambler चा चक्काचूर!

भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू, Ducati scrambler चा चक्काचूर!

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन पृथ्वीराजला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

  • Share this:

विशाल माने, प्रतिनिधी

परभणी, 11 जुलै : भाजपचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलगा पृथ्वीराज फड याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शहरातील उड्डाणपुलावर त्याच्या दुचाकीला अपघात झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मोहन फड यांचा मुलगा पृथ्वीराज फड हा मुंबईत शिक्षण घेत होता. महाराष्ट्रात कोरोनाच्या परिस्थितीमुळे लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज फड हा मुंबईहून परभणीला आला होता. शुक्रवारी संध्याकाळी तो आपल्या डुकाटी स्क्रम्बलर (ducati scrambler) बाइकवरून गंगाखेड रस्त्याच्या दिशेनं जात होता. त्यावेळी उड्डाणपुलावर जात असताना त्याच्या बाइकला अपघात झाला. त्यांचा नेमका अपघात कशामुळे झाला हे समजू शकले नाही.

लॉकडाऊनचा ट्रेण्ड कधीपर्यंत संपेल? तज्ञांसोबतच्या चर्चेनंतर शरद पवारांचा अंदाज

परंतु, हा अपघात इतका भीषण होता की, महागडी असलेली डुकाटी स्क्रम्बलर बाइकचा समोरचा भाग पार चक्काचूर झाला. धडक इतकी जोरात होती की, बाइकचे हँडल सुद्धा तुटले. घटनास्थळी पृथ्वीराज याचे हेल्मेट सुद्धा इतर ठिकाणी पडल्याचे आढळून आले.

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन पृथ्वीराजला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी पृथ्वीराजला तपासून मृत घोषित केले.

धक्कादायक! धुळ्यात अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

घटनेची माहिती मिळताच फड कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. लॉकडाउनच्या काळात घरी आलेल्या पृथ्वीराजच्या अपघाती निधनामुळे फड कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

मोहन फड पाथरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार असून, 2014 साली ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते भाजपच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या घटनेमुळे फड यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: sachin Salve
First published: July 11, 2020, 9:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या