Home /News /maharashtra /

वनरक्षकाला कपडे काढून काठीने बेदम मारहाण, पंढरपुरातला VIDEO व्हायरल

वनरक्षकाला कपडे काढून काठीने बेदम मारहाण, पंढरपुरातला VIDEO व्हायरल

 सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी गावात ही घटना घडली आहे. हंगामी वनरक्षक कर्मचारी दादा मोरे याला गावातील गुंडांनी बेदम मारहाण केली आहे.

पंढरपूर, 13 सप्टेंबर : पंढरपूरमधील (Pandharpur ) सांगोला तालुक्यात गावातील गुंडांनी (goons) एका हंगामी वनरक्षक कर्मचाऱ्याला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी गावात ही घटना घडली आहे. हंगामी वनरक्षक कर्मचारी दादा मोरे याला गावातील गुंडांनी बेदम मारहाण केली आहे. ऊस आणि लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली. दादा मोरे याला कपडे काढून खाली बसवण्यात आले, त्यानंतर ऊस आणि काठीने मारहाण करण्यात आल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे. गावातील गुंडांनी या घटनेचा व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड केला आहे. वनरक्षक दादा मोरे याने गावातील महिलेची छेड काढल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. दादा मोरे याला डोंगरात गाठून या गाव गुंडांनी शिवीगाळ करत मारहाण केली. हनिमूनसाठी गेलं होतं दाम्पत्य, पतीमुळे पुरती फजिती; बिचारी पत्नी एकटीच परतली घरी शनिवारी दुपारी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पण, मारहाणाची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. अखेर या प्रकरणी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या आधारे पोलीस मारहाण करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Pandharpur

पुढील बातम्या