मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सातारा: पॅराग्लायडिंग परदेशी पर्यटकाच्या जीवावर बेतलं

सातारा: पॅराग्लायडिंग परदेशी पर्यटकाच्या जीवावर बेतलं

पाचगणी येथील टेबल लॅन्डवरून पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

पाचगणी येथील टेबल लॅन्डवरून पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

पाचगणी येथील टेबल लॅन्डवरून पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

पाचगणी, 13 फेब्रुवारी: पाचगणी येथील टेबल लॅन्डवरून पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. फांगा फेक ओ असे या पर्यटकाचे नाव आहे. कोरिया देशातून एक पॅराग्लायडिंग करणारा ग्रुप गेल्या काही दिवसापासून वाई-महाबळेश्वर येथे मुक्कामी आहे. त्यांना वाईमधील काही स्थानिक मंडळी मदत करत आहेत. ही टीम टेबललॅन्डवरून उड्डाण केल्यानंतर ते हळू हळू हवेच्या दिशेने आकाशात तरंगतात.

काल सायंकाळी प्रमाणापेक्षा जास्त हवा असतानाही यातील काही जण हवेत झेपावले आणि त्यांनी हवेला भेदत आकाश गाठले. यातील एक वगळता उर्वरीत सर्वजण पुन्हा खाली उतरले मात्र फांग फेक ओ हा पुन्हा आलाच नाही. अंधार पडत चालल्यामुळे त्यांची सर्व टीम आणि स्थानिकांनी शोध घेण्यास सुरवात केली. दरम्यान फांग फेक ओ हा पाचगणीच्या दरी लगत असलेल्या अभेपुरी या गावातील एका झाडावर मृत अवस्थेत लटकताना मिळून आला. त्याचा मृतदेह ट्रेकर्सच्या आणि स्थानिकांच्या मदतीने खाली उतरवून त्याला रात्री उशिरा वाईच्या मिशन रूग्णालयात आणले.

फांग फेक याचा अंदाज चुकल्यामुळे तो झाडावर आपटला गेला असावा आणि मार जास्त लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

हा पर्यटक कोरिया देशातील असून त्याच्या सोबतची असलेली सर्व टीम ही कोरीया देशातीलच असल्याचे समजते. या घटनेमुळे मात्र सर्व पर्यटक आणि यांना सहकार्य करणारे सर्वजण अस्वस्थ झाले आहेत.

मुळात अशा खेळावर काही वर्षापूर्वी जिल्हाधिका-यांनी बंदी आणली होती. यातून वादही झाले होते. मात्र तरीही परवानगी नाकारण्यात आली होती. आता कोरियाच्या ग्रुपला नेमकी कोणी परवानगी दिली. हे मात्र समजू शकले नाही. या बाबत मात्र वाई पोलिस शोध घेत आहेत.

मन हेलावून टाकणारी घटना; एका क्षणात 7 वर्षाचा मोनिश कोसळला

First published:

Tags: Death, Foreigner tourist, Paragliding, Satara