Home /News /maharashtra /

अकोलेकरांना घरपोच मेजवानी, वडिलांचा वारसा जपणाऱ्या निशिताची नवी कहाणी!

अकोलेकरांना घरपोच मेजवानी, वडिलांचा वारसा जपणाऱ्या निशिताची नवी कहाणी!

निशिता

निशिता ने स्वतः फूड मॅनेजमेंट मध्ये पदवी  प्राप्त केली आहे....

निशिताने स्वतः फूड मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली असून हे स्वतःच आगळंवेगळं स्टार्टअप सुरू करण्याचं धाडस केलं आहे.

    अकोला, 25 मे : खाणे हा प्रत्येकाच्याच आवडीचा विषय, चविष्ट आणि आपल्या आवडीचे खायला मिळावे असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि अशा खवैय्यांसाठी वेगवेगळ्या संकल्पनाही आकारास येत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण ‘क्लाऊड किचन' (Cloud Kitchen) या संकल्पनेचा उल्लेख करु शकू..हवी हवीशी वाटणारी डिश,स्वादिष्ट जेवण अगदी आपल्याला घरपोच मिळत असेल तर कुणाला नको असतं? आणि असंच अत्यंत वेगळ्या टेस्टचं जेवण आणि विविध खाद्य पदार्थ अकोलेकरांच्या घरपोच पोहोचविण्याचा संकल्प घेऊन निशिता निरज आवंडेकर (Nishita Niraj Awandekar) या शेफने आपले ‘'निशिताज् क्लाऊड किचन' (Nishitaz Cloud Kitchen) घेऊन दाखल झाली आहे. निशिता ने स्वतः फूड मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली असून हे स्वतःच आगळंवेगळं स्टार्टअप सुरू करण्याचं धाडस केलं आहे. निशिताने स्वतः मोठमोठ्या हॉटेलमध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्याने त्याचा लाभ या क्लाऊड किचनला मिळणार आहे. चविष्ट पदार्थ बनविण्याचा वारसा वडील निरज आवंडेकरांकडून मिळाल्याने दोघा बापलेकीच्या संकल्पनेतून अकोलेकरांना स्वादिष्ट खाद्य पदार्थांची मेजवाणी मिळणार आहे आणि हेच ' निशिताज् क्लाऊड किचन'चं महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरणार आहे. खाण्यापिण्याच्या सवयी काळानुसार बदलत आहेत.त्यामुळे आपणही बदललं पाहिजे या भावनेतून हे क्लाऊड किचन सुरू होते आहे. संपूर्ण जगात जी संकल्पना आज चालते आहे ती आपल्या अकोल्यात आपण साकारली पाहिजे ही बाब निशिताच्या मनात आल्याबद्दल तिचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. कोविडमुळे सर्वजण हॉटेलमध्ये जाऊन जेवण घेण्याऐवजी घरीच जेवण मागविण्यावर भर देत आहेत आणि नेमक्या ह्याच बाबीची पूर्तता क्लाऊड किचनमध्ये करण्यात आली आहे. ग्राहकांच्या वेळेची व पैशाची मोठी बचत यामध्ये होते. कारण आजकालच्या कार्यकुशल पिढीला वेळेचे महत्त्व फार आहे. त्यामुळे त्या वेळेचे महत्त्व जाणणाऱ्यांसाठी निशिताज् क्लाऊड किचन हा खूप उपयुक्त पर्याय ठरणार आहे. आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करुन सहजतेने ऑर्डरची आणि अन्न पदार्थांची देवाण - घेवाण होऊ शकते आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापरही निशिताने या संकल्पनेत केल्याचे दिसून येते. निशिताच्या अंगी असणारे खाद्य पदार्थ विषयक टॅलेन्ट आता क्लाऊड किचनच्या रुपाने प्रत्यक्षात पारंपरिक,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सर्वच पदार्थ आपल्याला घरी बसून खायला मिळणार आहेत. निशिताच्या क्लाऊड किचनचे वैशिष्ट्ये इतर कुठल्याही आणि कोणत्याही खाद्यसंस्कृती इतके वैविध्य आणि लज्जत अकोलेकरांची खाद्यसंस्कृती देखील आहेच. आंबट,तिखट,गोड या टोकाच्या चवी अकोल्याच्या खाद्यसंस्कृतीत गुण्या गोविंदाने नांदतात. पाककला तसं पाहिलं तर एक रसायनशास्त्रच आहे. त्याची रासायनिक प्रक्रिया नीट साधली,तर पदार्थ जमतो,नाही तर फसतो,मात्र निशिता हीच स्वतः पाककलेच्या पदवीची पात्रताधारक असल्याने व एकंदरीतच अकोलेकरांच्या खवय्येगिरीचा सखोल अभ्यास असल्यामुळे भोजनात काय असावे,कसे असावे याची जाण तिला आहे,याबाबतची एक शिस्त ही एक महत्त्वाची खासियत या ' क्लाऊड किचन' मध्ये आहे. आपल्याला आवडेल तसे प्रिपरेशन मिळाले तर अकोलेकरांना त्याचा आस्वाद आपल्या कुटुंबासह आनंदाने घेता येईल. एकदा त्यांच्या जीभेला खात्री पटली आणि या सगळ्याच जमेच्या बाजू त्यांनी अनुभवल्या की निशिताज् क्लाऊड किचनच्या ठिकाणचं पुन्हा पुन्हा जेवावसं वाटेल हे मात्र नक्की. तुम्ही म्हणाल क्लाऊड किचन म्हणजे काय रे? ‘ क्लाऊड किचन ’ म्हणजे नक्की काय ? हा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात आला असेल, तर क्लाऊड किचन म्हणजे दुसरं काही नसून एक रेस्टॉरंटच आहे पण या किचनमध्ये आपल्याला हॉटेलमध्ये बसून ऑर्डर देतो , तशी आर्डर द्यायची सोय नसते. त्याचबरोबर ऑर्डर देऊन टेकअवे पण करू शकतो. क्लाऊड किचनमध्ये पूर्णपणे थर्ड पार्टी इंटिग्रेशन असतं . ज्यात तुम्ही पदार्थ कॉलवर, डिलिव्हरी अॅपव्दारे किंवा मग वेबसाईट वर ऑर्डर करु शकता. तुम्हाला घरपोच सेवा मिळते. दुसरं म्हणजे क्लाऊड किचनची जागा निवडताना तिथे पार्किंग आहे की नाही, मोक्याचं ठिकाण आहे की नाही या गोष्टींचा विचार करावा लागत नाही. पण ज्या जागेत खाद्यपदार्थ बनवतो त्या जागेची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. क्लाऊड किचन ही खरंतर मेट्रो सिटीज मधील संकल्पना आहे. पण आपण आपल्या अकोल्यासारख्या शहरातही ती सुरू करू शकतो या विचाराने निशिताने या आनंद देणाऱ्या व्यवसायाची निवड केली आहे.
    First published:

    पुढील बातम्या