अहमदनगर, 15 जानेवारी : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram panchayat 2021 ) आज मतदान होत आहे. अहमदनगरमध्येही मतदान होत असून नगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या आदर्श गाव हिवरे बाजार मध्येही प्रथमच 30 वर्षानंतर निवडणुका होत आहे.
आदर्शवादी सरपंच पोपटराव पवार यांनी प्रथमत सरपंच पदासाठी मतदान केले आहे आणि ते प्रथमच ही निवडणूक लढवत आहे. हिवरेबाजारमध्ये 30 वर्षानंतर निवडणुका होत असल्याने अधिकच चर्चेचा विषय बनला आहे. लोकशाही निवडणुका होणे अपेक्षित आहे. त्यामुळे लोकशाहीचा पाया मजबूत होत असतो, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
मात्र, अनेक वर्ष दडपशाही करून निवडणुका होऊन दिल्या नाही असा आरोप करत या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, ज्या पद्धतीने राजकारण झालं ते चुकीचा आहे. लोकशाहीने आम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे, असं मतही पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे समजत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून आम्हीच जास्त जागा जिंकल्या, असा दावा केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat, मतदान