• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक!

ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक!

उसाचं पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची अपव्यय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

  • Share this:
मुंबई, 18 जुलै : ऊस लागवडीसाठी यापुढे ठिबक सिंचन बंधनकारक करण्यात आलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. उसाचं पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची अपव्यय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी यापुढे ठिबक सिंचनाला सरकारतर्फे 25 टक्के अनुदानही मिळणार आहे. या निर्णयानंतर उसासाठीच्या बेसुमार पाणी वापराला चाप बसेल असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केलाय. ठिबक सिंचन बंधनकारक करण्याच्या निर्णयाने मोठया प्रमाणावर पाण्याची बचत होईल, असा दावा करण्यात येत आहे. ऊसाच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. मात्र ऊसाला पाणी देण्यासाठी पाईपलाईन किंवा थेट पाट पाडून पाणी दिलं जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं असा आरोप नेहमीच होत असतो. उसासाठी पाटाच्या पाण्याखाली सर्रास 'डुबूक सिंचन' पद्थतीने पाण्याचा अमर्याद वापर होतो. पण ठिबक सिंचन पद्धतीने ऊसाला पाणी दिलं तर पाण्याची मोठी बचत होईल, असा दावा करण्यात येत आहे. शेती करण्याच्या पद्धतीमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. सिंचनासाठी ठिबकचा वापर हे त्यातीलच एक पाऊल. ठिबकचा वापर होऊनही आता बराच काळ लोटला. पण त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आजही सीमित आहे.   'डुबूक सिंचन' म्हणजे काय ? पाटाचं पाणी ऊसाच्या फडात दारे न धरता तसंच सोडून द्यायचं आणि शेतात न जाता बांधावरूनच ढेकूळ अथवा दगड पाण्यात फेकून पाणी फडात पाणी भरलं की नाही हे बघायचे, यालाच डुबूक सिंचन पद्धती असे म्हणतात. विशेषतः ज्या भागात पाटाचं पाणी दिलं जातं. तिकडे मोठ्या प्रमाणावर अशाच पद्धतीने पाण्याचा बेसुमार वापर होतो. परिणामी अनेकदा जमीन क्षारयुक्तही बनते. कालांतराने ऊसाचं उत्पन्नही घटतं. ठिबक सिंचन म्हणजे काय ? या पद्धतीत संपूर्ण शेतात छोट्या पाईपांची पाईपलाईन अंथरून ड्रिपद्वारे पाणी दिलं जातं. त्यामुळे पाणी फक्त उसाच्या बुंध्यालाच मिळत आणि शेतात अनावश्यक तणही वाढत नाही...या पद्धतीत पाण्याची मोठी बचत होते. पण काहीवेळ उंदरांचा प्रादुर्भाव वाढला तर उदरं ही ठिबकची पाईपलाईन कुरतडून काढतात. परिणामी शेतकऱ्याला पाईप बदलण्याचा खर्च वाढतो. प्रत्यक्ष व्यवहारातील या अडचणीमुळे काही शेतकऱ्यांनी कालांतराने शेतात लावलेलं ठिबक सिंचन काढून टाकल्याचं आढळून आलंय. म्हणूनच सरकारला खरंच ठिबक सिंचन बंधनकारक करायची असेल कृषी संशोधकांनी अशा प्रकारच्या व्यावराहिक अडचणींवरही ठोस उपाय शोधण्याची गरज आहे. अनथ्या विनाकारण निर्णय थोपवल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण होईल.
First published: