भाजपकडून चेकमेट, कर्जतमध्ये रोहित पवारांना धक्का

भाजपकडून चेकमेट, कर्जतमध्ये रोहित पवारांना धक्का

रोहित पवार हे कर्जतमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरादार चर्चा रंगत आहे.

  • Share this:

कर्जत, 29 मे : कर्जमधील पंचायत समितीच्या सभापती साधना कमद यांनी भाजपसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांना कर्जतमध्ये भाजपने शह दिला आहे.

रोहित पवार हे कर्जतमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरादार चर्चा रंगत आहे. कर्जतमध्ये रोहित यांनी तशी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. कर्जतचे भाजप आमदार राम शिंदे यांच्या पंचायत समितीतील सत्तेला रोहित पवारांनी सुरूंग लावल्याचं बोललं जात होतं. कारण पंचायत समिती सभापती साधना कदम या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बातम्या समोर आल्या होत्या. पण आता साधना कदम यांनी राम शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपमध्येच काम करणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबत 'सरकारनामा' या वेबसाइटने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून राज्याच्या राजकारणात रोहित पवार यांचं लाँचिंग होणार आहे. विधानसभेत जाण्याची इच्छा असल्याचं सांगत वरिष्ठ सांगतील त्या मतदार संघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचं रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं.

'आपण आतापर्यंत सामाजिक जीवनात कार्यरत असताना अनेक भागात काम करत आहोत. त्यामुळे पक्षाकडून जिथे संधी मिळेल तिथून निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे,' असं म्हणत रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं होतं. हडपसर किंवा कर्जत या मतदारसंघातून रोहित पवार विधानसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून वृद्ध महिलेला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

First published: May 29, 2019, 12:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading